पुणे

महत्त्वाच्या शहरांची सुरक्षा तोकडी 

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम ठेवण्याची सूचना मुख्यमंत्र्यानी केली. प्रत्यक्षात मात्र, या शहरांमधील वर्दळीची ठिकाणे बेभरवशाची असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः पुण्यासह, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड येथील सुरक्षा व्यवस्थेत तृटी असल्याचे आढळून आले आहे. 

या शहरातील महत्त्वाच्या ठिकाणची पाहणी प्रजासत्ताक भारत पक्षातर्फे करण्यात आली. यामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी मेटल डिटेक्‍टर यंत्रणा बसविण्यात आली नसल्याचे आढळून आले तर, बसविलेल्या ठिकाणी या यंत्रणेचा वापर होत नसून ती बंद असल्याचे दिसले. शहरातील महत्त्वाची ठिकाणांवर अपुऱ्या सुरक्षा यंत्रणेमुळे शहरांची सुरक्षा धोक्‍यात आलेली आहे. 

पाहणी केलेल्या ठिकाणांमध्ये मुंबईतील मंत्रालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, नवी मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या इमारती, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इमारती, विविध प्रशासकीय इमारती, ऐतिहासिक ठिकाणे, पुणे सत्र न्यायालची इमारत, पुणे रेल्वे स्थानक यांचा समावेश आहे. यातील बहुतांश ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात आलेली असली तरी तिचा व्यवस्थित वापर होत नसल्याचे या पाहणीत आढळून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT