Police Commissioner Ritesh Kumar sakal
पुणे

Pune Womens Security : महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य - पोलिस आयुक्त रितेश कुमार

पुणे - शहरातील शाळा -महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘पोलिस काका’,‘पोलिस दीदी’ आणि ‘बडीकॉप’ योजना कार्यक्षमपणे राबविण्यात येईल.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील शाळा -महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘पोलिस काका’,‘पोलिस दीदी’ आणि ‘बडीकॉप’ योजना कार्यक्षमपणे राबविण्यात येईल. याबाबतचे आदेश सर्व पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांकडून सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली.

शहरातील संबंधित पोलिस ठाण्यांतील अधिकाऱ्यांकडून शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. पोलिस चौक्या २४ बाय ७ दिवस सुरू राहणार असून, सीसीटीव्हीने जोडल्या जातील. दामिनी पथकाची संख्या १५ वरून ४० पर्यंत वाढविण्यात येणार आहे. तसेच, बीट मार्शलची संख्याही शंभरवरून दोनशे करण्यात येणार आहे.

शाळा-महाविद्यालय सुरू होताना आणि सुटताना परिसरात बीट मार्शल आणि दामिनी पथकांनी गस्त घालावी, असे आदेश देण्यात आल्याची माहिती रितेश कुमार यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

गुंड टोळ्यांवर कठोर कारवाई

दत्तवाडी, वारजे, सहकारनगर आणि सिंहगड रस्ता परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत माजविणाऱ्या गुंड टोळ्यांतील ३२ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांचा घटनास्थळी पोचण्याचा ‘रिस्पॉन्स टाइम’ हा सात मिनिटांवर आणला जाईल, असे आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले.

पोलिस काका, पोलिस दीदी यांची कर्तव्ये -

- शाळा -महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संकट काळात मदतीसाठी धावून जाणार

- मुलींची छेडछाड, दादागिरी, रॅगिंगचा त्रास होत असल्यास मदत

- कोणी लग्नाचे, नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक होत असल्यास त्यावर लक्ष ठेवणे

- लैंगिक शोषण, गुड टच-बॅड टच रोखण्याबाबत प्रबोधन

- मुलींची, महिलांची वसतिगृहे, आश्रमशाळा, सुधारगृहांना भेटी देवून तक्रारींचा निपटारा

- शाळा-महाविद्यालयात तक्रार पेटी बसवून दर सोमवारी नोडल अधिकाऱ्यासमोर तक्रारींबाबत कार्यवाही

बडीकॉप योजना -

- परिमंडळ पोलिस उपायुक्त, सहायक आयुक्त आणि महिला पोलिसांचा सहभाग

- नोकरदार महिलांचे व्हॉटसअप ग्रुप तयार करणार, अडचण आल्यास व्हॉटसअप किंवा फोनद्वारे संपर्क.

- नोकरदार महिलांना २४ बाय ७ दिवस

मदत- नोकरदार महिलांच्या तक्रारी आणि मदत मागितल्यास त्वरित प्रतिसाद

- गृहिणी आणि महिला कामगारांच्या तक्रारी प्राप्त झाल्यास तातडीने मदत

- नोकरदार महिलांसाठी कामांच्या ठिकाणी सुरक्षिततेचा दर्जा उंचावणे

- प्रत्येक पोलिस ठाण्यात ५ ते १५ कर्मचाऱ्यांची बडीकॉप म्हणून निवड

नियंत्रण कक्ष क्रमांक - ११२

महिलांसाठी हेल्पलाइन - १०९१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

दुर्मीळ घटना! नवजात बाळाच्या पोटात आढळला दुसरा गर्भ; जगभरात फक्त 200 प्रकरणांमध्ये नोंद, काय म्हणाले डॉक्टर?

Latest Marathi News Live Update : चंद्रकांत पाटलांना जाब विचारणार, घायवळ प्रकरणावरून रवींद्र धंगेकर आक्रमक

Solapur News: 'मूर्तिकारांच्या अतिक्रमित २० झोपड्या जमीनदोस्त'; महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक, मंडई विभागाची संयुक्त कारवाई

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

SCROLL FOR NEXT