पुणे

सगर उत्सवासाठी मोहननगरमध्ये पूर्वतयारी

CD

चिंचवड, ता. ९ : दिवाळी पाडव्याच्या (बलिप्रतिपदा) मुहूर्तावर मोहननगर येथे वीरशैव लिंगायत गवळी समाजाचा पारंपरिक सगर उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी गवळी बांधवांनी सोमवार (ता.९) गोठ्यांची स्वच्छता करून त्यांची आकर्षक रोषणाई केली. म्हशींच्या सजावटीसाठी शिंगांचे रंग, बेगड, घुंगरांच्या माळा, नवीन कासरे, फुलांचे हार तसेच गेरू व विविध रंगांची खरेदी करण्यात आली.
सगर उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे. या उत्सवाची तयारी पाडव्याच्या आदल्या दिवसापासून सुरू होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गाई-म्हशींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो.
सायंकाळी म्हशींना शेंगुळपेंड खाऊ घालून नंतर दूध धारा काढल्यानंतर त्यांना विश्रांती दिली जाते. त्यानंतर रात्री ९ नंतर विश्रांतीवेळी त्यांच्या रंगरंगोटी व सजावटीची कामे केली जातात. उत्सवाच्या दिवशी मिरवणूक शिस्तबद्ध पार पडावी, यासाठी तरुणांसह ज्येष्ठ मंडळींकडून उत्सवमार्गाचे नियोजनही आदल्या रात्रीच करण्यात आले.

सगर उत्सव ही आमच्या समाजाची शेकडो वर्षांची परंपरा आहे. या उत्सवासाठी आदल्या दिवसापासूनच विशेष तयारी केली जाते. गोठ्यांची स्वच्छता, म्हशींची सजावट आणि रंगरंगोटी यासाठी सर्वजण उत्साहाने सहभागी होतात. मुक्या प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आमच्यासाठी आनंदाचा आणि श्रद्धेचा सोहळा आहे.
- चंद्रकांत अलंकार, मानकरी, सगर उत्सव, मोहननगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतातील एका वर्षाच्या आठवणींनी परदेशी पर्यटक भावुक; 'या देशाने जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला'

India Women Squad : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या वनडे, टी२० अन् कसोटी संघांची घोषणा! स्मृती मानधना असणार कर्णधार

Maharashtra Live News: मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध; मेढ्यात भाजप कार्यकर्ते व नागरिकांचा भव्य मोर्चा, कठोर कारवाईचा इशारा

Kolhapur Talent: एका इन्स्टा व्हिडीओने उघडले नशिबाचे दार; कोल्हापुरातून थेट अमेरिकेच्या बॉय बँडमध्ये एन्ट्री! जाणून घ्या दर्शन मगदूमचा भन्नाट प्रवास

Gokul Dairy Chairman Election High Court Ruling : 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीत सर्वात मोठा ट्विस्ट; मतदानापूर्वी कोर्टाचा निकाल, बदलले सत्तेचे गणित!

SCROLL FOR NEXT