पुणे

कऱ्हाड ः ४६ व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजला व्यक्तिगत व सांघिक जनरल चॅम्पियनशिप सगळीकडे स.ग. मा. चा डंका

CD

युवा महोत्सवात ‘सगाम’ला जनरल चॅम्पियनशिप

पथनाट्य, सुगम गायन, लोकनृत्य, वादविवादासह सहा प्रकारांत प्रथम क्रमांक

कऱ्हाड, ता. ३ ः शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व विद्यार्थी विकास विभाग व बाळासाहेब देसाई कॉलेज यांच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सातारा जिल्ह्यामधून एकूण ५० महाविद्यालयांनी एकूण १४ कला प्रकारात १५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. एकूण ४२ परीक्षकांनी आपल्या वेगवेगळ्या कला प्रकाराचे परीक्षण केले. यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे सद्‍गुरू गाडगे महाराज कॉलेज, कऱ्हाडने सर्वच कलाप्रकारात आपले वर्चस्व गाजवले व सांघिक व व्यक्तिगत चॅम्पियनशिप प्राप्त केली.
पथनाट्य प्रथम क्रमांक, सुगम गायन प्रथम क्रमांक, प्रश्नमंजूषा प्रथम क्रमांक, लोकनृत्य प्रथम क्रमांक, वादविवाद प्रथम क्रमांक, प्रहसिका प्रथम क्रमांक, तर एकपात्री द्वितीय क्रमांक, मूकनाट्य द्वितीय क्रमांक, मराठी वक्तृत्व द्वितीय क्रमांक, इंग्रजी वक्तृत्व तृतीय क्रमांक, हिंदी वक्तृत्व तृतीय क्रमांक, एकांकिका तृतीय क्रमांक अशाप्रकारे सगाम महाविद्यालयाने सर्वच कला प्रकारात आपली एक वेगळी प्रतिमा तयार केली. यामुळे या महाविद्यालयाला सांघिक व व्यक्तिगत जनरल चॅम्पियनशिप मिळाली आहे.
या अलौकिक देदीप्यमान यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी सर्वच विद्यार्थी कलाकारांचे व सांस्कृतिक विभागप्रमुख प्राध्यापक अनंत निकम व त्यांच्या सर्व सहकारी कलाकारांचे व सहकार्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले. मंगळवारी (ता. ६) मुधोजी कॉलेज, फलटण येथे होणाऱ्या मध्यवर्ती युवा महोत्सवास अशीच कामगिरी करावी, असा आशावाद व्यक्त केला.
युवा महोत्सवात मिळालेल्या यशस्वी कलाकारांचे महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉ. यू. बी. मोरे, प्राध्यापक डॉ. आर. बी. व्हनबट्टे, प्राध्यापिका एम. बी. कांबळे, आयक्युएसी समन्वयक प्राध्यापक डॉ. गिरीश कल्याणशेट्टी, संस्थेचे अजीव सेवक प्रा. डॉ. ए. के पाटील, महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक या सर्वांनीच सर्व कलाकारांचे अभिनंदन केले.

-----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MVA Legislative Council : विधानपरिषदेवरून महाविकास आघाडीत एकमत नाही, काँग्रेस, ठाकरे गटात ठिणगी पडली

Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईतील 'हायप्रोफाईल' घरफोडीचा एलसीबीकडून छडा; फरार म्होरक्याला बेड्या, कोट्यवधींचा ऐवज जप्त

Otur News : खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचा? कठोर पावले उचलण्याची गरज

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

SCROLL FOR NEXT