sahakar nagar road digging pit hole 
पुणे

सहकारनगरमध्ये कामानंतर खड्डे जैसे थे; खोदाईमुळे नागरिक हैराण

अजित घस्ते

सहकारनग(पुणे) : सहकारनगर परिसरातील अंतर्गत रस्त्यांची खोदाई सुरू आहे. सध्या याठिकाणी एमएनजीएल गॅस लाईन व एलएनटीच्या पाण्याचा पाईप लाईनची कामे सुरू असल्याने रस्ते खोदाई केली आहे. तसेच सहकारनगर भागात चांगले पदपथ काढून तेथे नवीन पदपथ बांधण्यात येत आहेत. सामान्य नागरिकांच्या करातून झालेल्या पैशाची अक्षरशः उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. यावेळी अमित अभ्यंकर (सहकारनगर) म्हणाले, ''सहकारनगरमधील अंतर्गत रस्ते खोदाई करून ठेवले आहेत. सर्व कामे अर्धवट करून ठेवल्याने सहकारनगर भागाला भकासपणा आला आहे. रस्त्यावर राडारोडा तसाच पडला आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक व पादचाऱ्यांना रस्त्यावरून जाणे अवघड झाले आहे.''

यावेळी नितीन करंदीकर म्हणाले, ''सहकारनगर तुळशीबागवाले कॉलनी दशभुजा गणपती मार्गावर गॅस पाईपलाईन टाकून पंधरा दिवस झाले तरी खड्डे भरले गेले नाहीत. यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. यामुळे येथील ज्येष्ठ नागरिक वाढत्या खोदाईला हैराण झाले आहेत.

 हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ


यावेळी प्रज्ञा पोतदार-पवार (सहाय्यक आयुक्त मनपा सहकारनगर-धनकवडी क्षेत्रीय कार्यालय) म्हणाल्या, सहकारनगर भागातील रस्ते खोदाई करून रस्त्यावर राडारोडा पडला असेल तर तो क्षेत्रीय कार्यालय मार्फत काढण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT