पुणे

प्रासंगिक : एका दवाखान्याचे सहस्रचंद्रदर्शन...

एक दवाखाना, एकाच वास्तूत सलग ८१ वर्ष रुग्णसेवेत कार्यरत असून काही हजार रुग्ण त्या वास्तूत झालेल्या उपचाराने बरे झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

-विवेक देशपांडे

एखाद्या माणसाने वयाची ८१ वर्षे पूर्ण केली, तर त्याचा सहस्रचंद्रदर्शनाचा कार्यक्रम केला जातो. मात्र, एका दवाखान्याला येत्या रविवारी (ता. २२) नारळी पौर्णिमेच्या दिवशी ८१ वर्षे पूर्ण होत असून, त्याच्या सहस्रचंद्रदर्शनानिमित्त डॉ. आनंद निगुडकर यांच्या रुग्णसेवेचा घेतलेला हा आढावा...

कै. विठ्ठल निगुडकर हे मुळचे कोकणातील कणकवली गावचे आणि शिकण्यासाठी पुण्यात आले. डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी नारळी पौर्णिमेच्या दिवशी १७ ऑगस्ट १९४० रोजी सदाशिव पेठेत हा दवाखाना सुरू केला. त्यानंतर १९६८ सालापासून त्यांचे पुत्र डॉ. आनंद निगुडकर यांनी या दवाखान्याची सूत्रे हाती घेतली. तेव्हापासून ते वडिलांची रुग्णसेवेची धुरा निष्ठेने सांभाळत आहे. एक दवाखाना, एकाच वास्तूत सलग ८१ वर्ष रुग्णसेवेत कार्यरत असून काही हजार रुग्ण त्या वास्तूत झालेल्या उपचाराने बरे झाले आहेत. टिळक स्मारक मंदिराकडून पेरुगेटकडे जाताना हा दवाखाना लागतो.

हा दवाखाना अत्यंत साधा असून यात कोणताही भपका नाही किंवा आतमध्ये कोणतेही उंची फर्निचर नाही. डॉ. आनंद निगुडकर यांच्याकडे अजूनही कॉम्प्युटर आणि रिसेप्शनिस्टही नाही. ते स्वतः लवकर येऊन दवाखाना पूर्णपणे झाडून काढतात. बरोबर नऊच्या ठोक्याला ते दवाखान्यात हजर असतात. ते आजही सायकल वापरतात. डॉक्टरांचे निदान हे अगदी पक्के आणि बिनचूक असते. सर्दी-पडशावर ते बाटलीतील पातळ औषध देतात आणि त्याने रुग्णांना बरेही वाटते. स्वतः कडची औषधे दिली, तर ते त्याचे रुग्णांकडून पैसेही ते घेत नाहीत. अभिनेते दिलीप प्रभावळकर, मोहन जोशी, मृण्मयी देशपांडे, गौतमी देशपांडे, दिलीप माजगावकर, सरोजनी बाबर, निर्मला पुरंदरे आदींचे कित्येक वर्षांपासून ते फॅमिली डॉक्टर आहे.

डॉक्टर इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत. अनेक वर्तमानपत्रांत त्यांनी वैद्यकीय व्यवसाय व उपचारावर विपुल लेखन केले आहे. त्यांना २००५मध्ये ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ तर्फे लाइफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्ड’ सन्मानित करण्यात आले असून इतरही परितोषके त्यांना मिळाली आहेत. ‘फॅमिली डॉक्टर’ ही संज्ञा जपणारे डॉक्टर म्हणून आनंद निगुडकर यांना ओळखले जाते.

त्यांना प्रत्येक रुग्णाची पूर्ण माहिती असते आणि कधीही गेलात तरी, मागच्या वेळी तुम्हाला काय औषधे दिली होती याची नोंद त्यांच्या नोंदवहीत असते. त्यानुसारच ते औषधोपचार करतात. आज-काल फार थोडे डॉक्टर घरी येऊन रुग्णावर उपचार करतात. मात्र, डॉ. आनंद निगुडकर हे त्याला अपवाद आहेत.

वैद्यकीय व्यवसाय सेवाभावी वृत्तीने करत असल्याने त्यांची तपासणी फी कमी आहे. रुग्णांची मानसिक स्थिती समजावून घेऊन त्याप्रमाणे योग्य तो सल्ला देण्याचे काम डॉक्टर करतात. डॉ. आनंद निगुडकर हे वडिलांप्रमाणेच शिस्तीचे भोक्ते आहेत. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हसाठी त्यांनी ठराविक वेळ राखून ठेवली आहे. जेणेकरून रुग्णांना त्यांचा त्रास होऊ नये. वडिलांनी रुग्णसेवा केलेल्या मूळच्या वास्तूला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता त्याच ठिकाणी गेली ५३ वर्ष त्यांची रुग्णसेवा इमान-इतबारे सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या पत्रानंतरही मकर संक्रातीला लाडक्या बहीणींना पैसं मिळणार? CM फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत विषयच मिटवला...!

BMC Election Voting: १५ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, मतदानाच्या दिवशी रजा नाकारणाऱ्या आस्थापनांवर कारवाई

Latest Marathi News Live Update : माजी आमदार शिरीष चौधरींच्या घरावरील हल्ला हा राजकीय कट; अवैध धंदेवाल्यांवर आरोप

Baba Vanga Predictions 2026: जग मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर? माणसांची निर्णयक्षमता हरवणार, पृथ्वीवर परग्रहवासी येण्याचा दावा

Aluminum Foil किंवा Container मध्ये अन्न ठेवता? जीवावर बेतेल; तज्ज्ञांचा धक्कादायक इशारा

SCROLL FOR NEXT