Sahebrao Karpe
Sahebrao Karpe sakal
पुणे

Sahebrao Karpe Death Anniversary : १९ मार्चला राज्यभरात अन्नत्याग दिवस; साहेबराव करपे यांच्या स्मृतिनिमित्त आयोजन

संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर - साहेबराव करपे या शेतकऱ्याची पहिली आत्महत्या १९ मार्च १९८६ साली नोंदली गेली होती. करपे यांच्यानंतरही लाखो शेतकऱ्यांना प्राणत्याग करावा लागला. आजही शेतकरी आत्महत्या वाढतच आहेत. त्या तमाम शेतकऱ्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी १९ मार्चला राज्यभरात अन्नत्याग (उपवास) दिवस पाळणार आहोत, अशी माहिती शेतकरी नेते अमर हबीब व ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिली.

१९ मार्च १९८६ साली यवतमाळ येथे शेतकरी साहेबराव करपे यांनी पत्नी व मुलांसह सामूहिक आत्महत्या केली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. यानंतर आजतागायत पाच लाख शेतकऱ्यांनी देशभरात आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. मागील वर्षापेक्षा चालू वर्षात एक हजाराने जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

मात्र त्यांच्याबाबत लोकसभेत, विधानसभेत श्रध्दांजली घेण्यात आली नाही. आता शेतकरी संघटना, लेखक-विचारवंत यांनीच या शेतकऱ्यांप्रती श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी अन्नत्याग दिवस पाळण्याचा आणि यानिमित्ताने ठिकठिकाणी पदयात्रा, शोकसभा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

किसानपुत्र आंदोलनाचे प्रमुख अमर हबीब म्हणाले,परभणी जिल्ह्यात दैठणा ते पाथरी आणि सांगली जिल्ह्यात दिग्रज ते जयसिंगपूर अशा दोन पदयात्रा होणार आहेत. पुणे, बीड येथे दिवसभर अन्नत्याग पाळून सायंकाळी एकत्रित सभा होणार आहेत. याशिवाय ज्येष्ठ समाजसेवक अभय बंग (वर्धा), लेखक हेरंब कुलकर्णी (अहमदनगर), निवृत्त अधिकारी पुरूषोत्तम गावंडे (अकोला), गझलकार गजानन वाघमारे (महागाव), कवयित्री अंजली कुलकर्णी (पुणे), आदिवासींचे आरोग्यमित्र डॉ. सतीश गोगुलवार (गडचिरोली), पत्रकार जतीन देसाई (मुंबई), साहित्यिक डॉ. मारोती कसाब (उदगीर), डॉ. आशिष लोहे (अमरावती) आदी सामाजिक कार्यकर्ते, लेखक मंडळींसह शेकडो ठिकाणी राज्यभरात लोक अन्नत्याग आंदोलनात सहभागी होणार आहेत.

निवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, भूक भागविणाऱ्या पोशिंद्यासोबत आपण आहोत ही सहअनुभूती व्यक्त करण्यासाठी हा उपवास आहे. दिवसभराच्या अन्नत्यागानंतर पुणे येथे नियोजित ठिकाणी एकत्र जमून सभा घेणार आहोत. त्याला हमीभाव मिळावा, सरकारी धोरणे नीट राबवावी अशी अपेक्षाही यातून आहे. कारण भाव मिळतात तेव्हा निर्यातबंदी लादतात आणि भाव वाढतात तेव्हा आयात करतात. मध्यमवर्गीय, उद्योगपतींच्या हिताची ही दृष्टी बदलायला हवी. निदान त्याच्या वाटेत खिळे ठोकू नयेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT