पुणे

सह्याद्रीचा वारसा विकण्याचा प्रयत्न

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : छत्रपती शिवाजी महाराजांचा पावन वारसा असलेल्या सह्याद्रीच्या कुशीतील समृद्ध वनसंपदेवर महायुती सरकारने कुऱ्हाड चालवली आहे. भाजप सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व मनसुबे हाणून पाडू. वेळप्रसंगी कर्जत भीमाशंकरच्या वनसंपदेचे रक्षण करण्यासाठी न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
टोरंट कंपनीसाठी कर्जत भीमाशंकरच्या जंगलात होत असलेल्या झाडांच्या कत्तलीची आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पाहणी केली. त्यानंतर स्थानिकांशी संवादही साधला. या वेळी सपकाळ म्हणाले की, टोरंट कंपनीसाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड माँ के नाम’ हा संकल्प केला असताना महाराष्ट्रात झाडांची कत्तल केली जात आहे. पंतप्रधानांचा संकल्प आम्ही आज कर्जतच्या जंगलात वृक्षारोपण करून पूर्ण केला.


कर्जत भीमाशंकरच्या जंगलात होत असलेला हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हिताचा नाही. या प्रकल्पातून हजारो रोजगार निर्माण होतील. या वृक्षतोडीच्या बदल्यात दुसरीकडे लाखो झाडे लावू या केवळ पोकळ घोषणा आहेत. याआधी याच सरकारने ३३ कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला होता त्याचे काय झाले? भाजप सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत.
- हर्षवर्धन सपकाळ,प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

निकालाने सत्तेचे गर्वहरण झाले
राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन जागा जिंकून महायुती सरकारचा धुव्वा उडवला. निकाल सुरू असतानाच घाईघाईत पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी काँग्रेसला हिणवणारे ट्विट केले होते; पण निकाल येताच हे ट्विट त्यांना डिलीट करावे लागले. फडणवीस यांनी स्वतः नागपूरच्या निवडणुकीत सर्व शक्ती पणाला लावली होती. तेथेच त्यांचे नाक कापले आहे, हा निकाल परिवर्तनाची नांदी आहे, असेही सपकाळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ABHISHEK SHARMA RECORD: अभिषेक शर्माच्या निशाण्यावर राहुल-हार्दिकचा विक्रम! चौथ्या T20 सामन्यात इतिहास घडवण्याची संधी

PCMC ACB raid on Chief Engineer : पिंपरी-चिंचवड महापालिकेत ACB ची मोठी कारवाई! थेट मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयातच धाड; ठेकेदाराकडून लाच मागताना बड्या अधिकाऱ्याला बेड्या

Latest Marathi News Update: डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

चंद्राच्या राशीबदलामुळे ‘या’ ३ राशींनी जरा जपून राहावं; बँक बॅलन्सला धोका? पैशांचं नुकसान टाळण्यासाठी कोणत्या राशींनी राहावं सावध?

Satej (Bunty) Patil on Hasan Mushrif Gokul : 'त्यांना गोकुळ दूध संघच बंद पाडायचाय!' हसन मुश्रीफांच्या टीकेनंतर बंटी पाटलांचा थेट आरोप, 'सहकारातील काळा दिवस' म्हणत मांडली रोखठोक भूमिका!

SCROLL FOR NEXT