Me Honar Super Star sakal
पुणे

Me Honar Super Star : पुण्याच्या सई आणि शरयूच सुपरस्टार होण्याचं स्वप्न झालं साकार…

पुण्याच्या सई आणि शरयू ठरल्या ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’च्या महाविजेत्या

- अरुण सुर्वे

पुणे : स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. सागर आणि दिव्येश, झीरो डिग्री क्रू ग्रुप, डी टू डी क्वीन्स ग्रुप, श्रीमयी सूर्यवंशी, सई आणि शरयू यांच्यामध्ये ही महाअंतिम लढत रंगली.

अटीतटीच्या या लढतीत पिंपरी पुणे येथील सई आणि शरयू यांनी बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेते ठरले जळगावचे सागर आणि दिव्येश. तृतीय क्रमांकाचा मान कल्याणच्या झीरो डिग्री क्रू ग्रुप आणि कराडच्या डी टू डी क्वीन्स ग्रुप यांना विभागून देण्यात आला.

तर श्रीमयी सूर्यवंशीला उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल गौरवण्यात आलं. महाअंतिम सोहळ्यातील विजेत्या सई आणि शरयू यांना पाच लाखांची रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. या खास सोहळ्यात सई आणि शरयूला शुभविवाह मालिकेतील भूमीनेही साथ दिली होती.

विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना सई आणि शरयू म्हणाल्या, ‘हा सारा प्रवास स्वप्नवत आहे. स्टार प्रवाहने दिलेल्या या संधीबद्दल आम्ही आभारी आहोत. महाअंतिम सोहळ्यात सामील होण्यासाठी आम्ही बरीच मेहनत घेतली होती. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे. या मंचाने अंकुश चौधरी, फुलवा खामकर आणि वैभव घुगे गुरुच्या रुपात दिले. या गुरुंकडून खूप काही शिकायला मिळालं.’

सई आणि शरयू या दोघीही पुण्यातल्या गौरव डान्स अकादमीमधून नृत्याचं शिक्षण घेत आहेत. याच दरम्यान त्यांना मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाविषयी कळलं आणि त्यांनी ऑडिशनसाठी थेट मुंबई गाठली. ऑडिशन ते विजेता हा त्यांचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे.

नृत्याची आवड आणि दोघींमधल्या घट्ट मैत्रीने सई आणि शरयूला विजेतेपदापर्यंत पोहोचवलं. इतक्या लहान वयात मिळालेलं हे घवघवीत यश त्यांचा पुढील प्रवास अधिक तेजोमय करेल हे नक्की. सई आणि शरयू जरी या पर्वाच्या विजेत्या असल्या तरी महाअंतिम फेरीतील सर्वच स्पर्धकांनी या पर्वात आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT