pune.jpg
pune.jpg 
पुणे

आम्ही कमळासोबतच, पण निवडणुक कमळ चिन्हावर लढणार नाही : रामदास आठवले 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) हा भाजपच्या कमळासोबतच राहील. परंतु आमचा पक्ष कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार नाही, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे. याबरोबरच भाजप-शिवसेना महायुतीकडे विधानसभेसाठी 10 जागांची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आठवले यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या कामांची माहिती दिली.याबरोबरच त्यांनी अनुसूचित जाती-जमाती अन्याय-अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत (ऍट्रॉसिटी) दाखल होणारे गुन्हे, व्हीजेएनटीसाठीचे आरक्षण यांसारख्या विविध विषयाबाबत माहिती दिली. कमळ चिन्हावरुन निवडणूक लढण्याविषयी आठवले म्हणाले, "मी तीन वेळा निवडणूक लढून जिंकलो आहे. त्यावेळी मी कधीही कॉंग्रेस पक्षाचे चिन्ह घेतले नव्हते. त्यामुळे आमचे उमेदवार कोणत्या चिन्हावर निवडून येऊ शकतात, याची आम्हाला चांगलीच माहिती आहे. निवडणुकीत आमचा पक्ष कमळासोबत राहील, परंतु कमळ चिन्हावर निवडणूक लढणार नाही.'' 

विधानसभा निवडणुकीबाबत आठवले म्हणाले, "मागील विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला भाजप-शिवसेनेने आठ जागा दिल्या होत्या. यावेळी महायुतीमधील मित्रपक्षांसाठी 18 जागा सोडल्या जातील. त्यापैकी आमच्या पक्षाला 10 जागांबाबत आम्ही आग्रही राहणार आहोत. या दहा जागांपैकी पुणे शहरातील एक व जिल्ह्यातील एका जागेसाठी पक्ष आग्रही आहे. तर उर्वरित जागा महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांना द्याव्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही आमची चर्चा झाली आहे'' 

देशात अनुसूचित जाती-जमातीपेक्षाही भटक्‍या व विमुक्त जाती जमातींचा (व्हिजेएनटी) स्थिती गंभीर आहे. देशात 60 टक्के सामाजिक आरक्षण आहे. त्यापैकी 8 ते 10 टक्के आरक्षण देण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे. याबरोबरच पुणे जिल्ह्यात 1989 पासून 816 ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 666 गुन्हे ग्रामीणमधील तर 150 गुन्हे शहरातील आहे. पुणे विभागात सर्वाधिक 824 गुन्हे साताऱ्यामध्ये, त्यापाठोपाठ 281 सांगलीमध्ये तर 156 कोल्हापूरमध्ये घडले असल्याचेही आठवले यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT