पुणे

नोव्हेबर मध्ये योग संमेलन तयारी

CD

सज्जनगडावर पहिले विभागीय योग संमेलन

नोव्हेंबरमध्ये आयोजन; जिल्ह्यात ठिकठिकाणी योग दिन उत्साहात

सातारा, ता. २४ ः सज्जनगड येथे नोव्हेंबरमध्ये पहिले विभागीय योग संमेलन होणार आहे. त्याच्या तयारीसाठी महाराष्ट्र योग शिक्षक संघ, जिल्हा सातारा यांच्या वतीने बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन ठिकठिकाणी उत्साहात झाला.
रहिमतपूर येथे सुमन परशराम फडतरे माध्यमिक प्रशालेत योग शिक्षक संघाचे अध्यक्ष मानसिंग गोडसे व महासचिव संदीप कणसे यांनी योगा प्रात्यक्षिक घेतले. संगम माहुलीतील श्रीराम हायस्कूलमध्ये योगशिक्षक संपत पवार, शहरांमध्ये गुरुवार बागेमध्ये योगशिक्षक बाळासाहेब निंबाळकर, देगावच्या धर्मवीर संभाजी महाराज विद्यालयात उपाध्यक्ष अशोक राजापुरे यांनी योग वर्ग घेतला. मालगाव माध्यमिक विद्यालयात दिनकर नाईक व डॉ. निरंजन देसाई यांनी, शाहू स्टेडियममध्ये शासकीय योग वर्गाला संस्थेच्या खजिनदार शोभा पाटील यांनी सहभाग नोंदवला. कालिकामाता योग वर्गाने शहरांत योग व प्राणायामाचा प्रचार व प्रसार जनसामान्यांत प्रभावी व्हावा, यासाठी योग साधकांची शहरातून विविध घोषणांच्या गजरात देवी चौक ते मोती चौक आणि शनिवार चौकातून कालिका देवी मंदिरापर्यंत प्रभात फेरी काढली. ग्रामपंचायत संभाजीनगरमध्ये योगशिक्षक बनसोडे यांनी योग वर्ग घेतला. मेढ्यातील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात योगशिक्षक प्रकाशराव श्रीनगरकर व श्री. घाडगे, योग शिक्षिका राजश्री भोसले यांनी प्रात्यक्षिके घेतली. नाडे (ता. पाटण) येथील रघुकुल बाल मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे मधू पाटील यांनी, भुईंज येथील माहेर योग कला, क्रीडाधाम येथे सागर दळवी, पूनम दळवी यांनी यशोदा टेक्निकल कॅम्पस येथे बीफार्मसीच्या विद्यार्थ्यांनी योगा प्रोटोकॉलचे प्रशिक्षण घेतले.

....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE: भारताचा T20I संघ आयर्लंडला पोहचला! कधी आणि कुठे पाहाणार सामने? तारखेसह Live Streaming डिटेल्स नोट करून ठेवा

'कॅटरिना' वाघिणीने केली दोन हरणांची शिकार; दृश्य कॅमेऱ्यात कैद, बोर व्याघ्र प्रकल्पातील थरार; पाहा VIDEO

Ketan Agrawal Murder Mystery: केतनच्या बहिणीनेच पकडला सियाचा खोटेपणा; अंत्यविधीनंतर आली होती भेटीसाठी, कुटुंब थेट पोलिस ठाण्यात

४,५०० वर्षे जुन्या मूर्तीला घातले कपडे ! NCERT च्या 'त्या' फोटोवरुन वाद; मूळ फोटो परत येणार का ?

प्रियकराच्या एका चुकीने सियाचा प्लॅन केला फेल; CCTVमध्ये पोलिसांना असं काय दिसलं? धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT