Sakal Auto Expo 2024  Sakal
पुणे

Sakal Auto Expo 2024 : सकाळ ऑटो एक्स्पोला आजपासून प्रारंभ; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते होणार उद्घाटन

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाहन उत्पादक कंपन्यांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे निरनिराळे पर्याय ग्राहकांना एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Pune News: ग्राहकांना आवड आणि निवड करून योग्य वाहन खरेदी करता यावे म्हणून ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘ऑटो एक्स्पो २०२४’ आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी (ता. १५) सकाळी ११ वाजता पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या याचे उद््घाटन होईल. रविवारपर्यंत (ता. १६) एक्स्पो खुले असेल.

यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाहन उत्पादक कंपन्यांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे निरनिराळे पर्याय ग्राहकांना एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. या एक्स्पोमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकलचेही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. टेस्टराईडची संधी असल्यामुळे गाडीची निवड करणे ग्राहकांना अधिक सोईस्कर होईल. २० पेक्षा जास्त ब्रँडची ६० पेक्षा जास्त मॉडेल्स एक्स्पोमध्ये उपलब्ध असतील.

पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक कार आणि दुचाकींचे अनेक पर्याय एक्स्पोत उपलब्ध असतील. या ठिकाणी विविध कंपन्यांच्या कार आणि दुचाकी, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांच्या किमती आदींची माहिती मिळणार आहे. वित्त पुरवठ्याबाबतही येथे मार्गदर्शन मिळणार आहे.

हे लक्षात ठेवा

कुठे : पंडित फार्म्स, डीपी रस्ता, कर्वेनगर

तारीख : शनिवार (ता. १५) आणि रविवार (ता. १६)

वेळ : सकाळी १० ते रात्री ८ प्रवेश व पार्किंग मोफत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

Mumbai Local: मुंबई लोकलच्या महिलांच्या डब्यात जबरदस्तीने प्रवेश नंतर...; व्यक्तीच्या कृत्यानं खळबळ, व्हिडिओ व्हायरल

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या संघात शेवटच्या क्षणात दोन बदल! ४ संघांकडून खेळणारा ऑल आऊंडर आला, सोबत सौराष्ट्रच्या किपरला घेतले

SCROLL FOR NEXT