Sakal Auto Expo 2024 sakal
पुणे

Sakal Auto Expo 2024 : पुण्यात शनिवारपासून ‘सकाळ ऑटो एक्स्पो’चे आयोजन

वाहन खरेदी होणार अधिक सोपी.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - वाहन खरेदीचा निर्णय घेताना विविध पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत, यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे दोन दिवस ‘सकाळ ऑटो एक्स्पो’चे आयोजन केले आहे. यामध्ये विविध वाहन उत्पादक कंपन्यांची नवी मॉडेल्स असतील. त्यामुळे ग्राहकांना मनपसंत वाहन खरेदी करता येईल.

कर्वेनगरमधील डीपी रस्त्यावरील पंडित फार्ममध्ये शनिवारी (ता. १५) आणि रविवारी (ता. १६) ऑटो एक्स्पो होणार आहे.

नवीन वाहन खरेदी करण्याचे ठरल्यानंतर आपल्या बजेटनुसार विविध कंपन्यांची वाहने आपण तपासतो. त्यासाठी अनेक कंपन्यांच्या शोरूमला भेटी देऊन माहिती घेताना होणारी धावपळ थांबविण्यासाठी ऑटो एक्स्पो आयोजित करण्यात आला आहे.

यामध्ये इलेक्ट्रिक व्हेईकलचेही अनेक पर्याय असतील. तसेच टेस्ट राईडचा आनंद सुद्धा अनुभवायला मिळेल आणि त्यामुळे वाहन खरेदी सोपी होईल. एक्स्पोत २०हून अधिक ब्रँडचे ६० पेक्षा अधिक मॉडेल उपलब्ध असतील.

बजेटनुसार वाहनांचे पर्याय

पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक कार आणि दुचाकीचे निरनिराळे पर्याय नागरिकांना एक्स्पोत उपलब्ध असतील. एकाच बजेटचे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने नेमकी कोणती गाडी घ्यायची? याचा निर्णय घेणे ग्राहकांना सोईस्कर होणार आहे. या ठिकाणी विविध कंपन्यांच्या कार आणि दुचाकी, त्यांची वैशिष्ट्ये, किमती आदींची माहिती मिळणार आहे.

एक्स्पोविषयी...

  • कधी : १५ आणि १६ जून २०२४

  • कुठे : पंडित फार्म, डीपी रस्ता, कर्वेनगर

  • केव्हा : सकाळी ११ ते रात्री ८

  • स्टॉल बुकिंगसाठी संपर्क : ९३२५१०६६२६

  • प्रवेश व पार्किंग मोफत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT