पुणे

सकाळ ब्यूटी स्पर्धेच्या ऑडिशन्स उद्या पुण्यात

सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यातील तरुणींच्या गुणवत्तेला संधी देण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘पु. ना. गाडगीळ ॲण्ड सन्स’तर्फे ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०१९’ स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेच्या पुण्यातील ऑडिशन्स बुधवारी (ता. ६) हडपसर येथील ॲमनोरा द फर्न हॉटेल्स ॲण्ड क्‍लब येथे होणार आहेत.

राज्यातील युवतींच्या सौंदर्याला, गुणवत्तेला यशाचे कोंदण देणाऱ्या या स्पर्धेचे राज्यात मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. आजपर्यंत ठाणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, सोलापूर या केंद्रांवर ऑडिशन्स पार पडल्या. आज जळगाव केंद्रावरही युवती मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. उद्या शेवटची म्हणजे आठव्या केंद्रावरील ऑडिशन्स पुण्यामध्ये होणार आहेत. आतापर्यंत झालेल्या ऑडिशन्समधून युवतींनी आत्मविश्‍वास अन्‌ उत्साहाने आपला सहभाग नोंदवला आहे. अभिनय, गायन, नृत्य, जिम्नॅस्टिक, भरतनाट्यम अशा अनेक माध्यमांतून युवती या ऑडिशन्समध्ये व्यक्त होत आहेत. 

ही स्पर्धा १८ ते २५ वयोगटातील अविवाहित तरुणींसाठी आहे. ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केलेल्या स्पर्धकांची योग्यता पारखून त्यांना ई-मेलद्वारे ऑडिशनसाठी बोलविले आहे. तसेच, लोकाग्रहास्तव बुधवारी ऑडिशन सेंटरवर स्पॉट रेजिस्ट्रेशनची सोय केली आहे. दरम्यान, प्राथमिक फेरीतून दुसऱ्या फेरीत निवडलेल्या स्पर्धकांना टॅलेन्ट राउंडमध्ये ९० सेकंदांचा नृत्य, अभिनय, संगीत किंवा इतर काही टॅलेंटमधून परफॉर्मन्स करावा लागेल. 

ऑडिशन्समधून स्पर्धक तरुणींची अंतिम फेरीसाठी निवड होईल. त्यानंतर त्यांचे ट्रेनिंग आणि ग्रुमिंग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात करण्यात येईल. स्पर्धेची अंतिम फेरी १६ फेब्रुवारीला पुण्यात होईल. या स्पर्धेचे फॅशन कोरिओग्राफर आणि टॅलेन्ट ग्रुमर लवेल प्रभू, तर श्रुती मंगेश डिझाइन व कॉस्च्युम पार्टनर आहेत. ॲमनोरा पार्क टाऊन लाइफ स्टाईल पार्टनर आहेत.

स्पर्धेविषयी....
  अधिक माहितीसाठी - www.sakalbeautyofmaharashtra.in 
  संपर्क : ९८९०२९२४९९, ७८८७८६७४४३ 
  अपडेट्‌स मिळवा - फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर 
  ऑडिशन्स तारीख : बुधवारी (ता. ६) सकाळी नऊ वाजता 
(यापूर्वी नावनोंदणी केलेल्या व निवडलेल्या स्पर्धकांसाठी) 
वॉकीन्स- स्पॉट नोंदणीसाठी... 
  बुधवार सकाळी ८ वाजता उपस्थित राहणे आवश्‍यक 
सर्व स्पर्धकांसाठी सूचना... 
  ड्रेस कोड - ब्लू जीन्स, व्हाइट टी-शर्ट व ब्लॅक स्टिलेटोज (४-५ इंच हिल), सिंगल पोनी, माईल्ड मेकअप आवश्‍यक. 


  ओळखपत्र आवश्‍यक 
  फोटो हार्ड कॉपी : क्‍लोज-अप, मिड प्रोफाइल, फूल प्रोफाइल फोटोज आवश्‍यक 
  ऑडिशन्सचे ठिकाण - ॲमनोरा द फर्न हॉटेल्स ॲण्ड क्‍लब, हडपसर, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT