sakal-exclusive 
पुणे

खाणावळी, वसतिगृहे लॉकडाउनच; स्पर्धा परीक्षार्थींची प्रतीक्षा

ब्रिजमोहन पाटील/ महेश जगताप

पुणे - "घरात गेल्या 18 वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी खाणावळ (मेस) चालवत आहे. लॉकडाउन लागले आणि खानावळ जवळपास बंदच झाली. काही मोजकेच विद्यार्थी पुण्यात होते, ते जेवायला येत असल्याने त्यांचा तेवढा आधार लाभला. कोरोनाने मानसिक नाही, तर आर्थिक स्थितीही ढासळली आहे. यातून लवकर बाहेर पडावे, अशी अपेक्षा करत या संकटाला वाट मोकळी करून दिली...मंदाकिनी राऊत यांची ही व्यथा. त्यांचे पती रिक्षाचालक आणि मुलगा नोकरीला होता. दोघेही आता घरीच असल्याचे त्यांनी सांगितले. 

मोहन शिंदे हे चहाचा स्टॉल चालवत आहेत. पूर्वी सकाळीपासून सायंकाळपर्यंत चहाची तलफ भागविण्यासाठी स्पर्धा परीक्षार्थी येत होते. सहा महिन्यांत मोठे आर्थिक नुकसान झाले, आता पुन्हा स्टॉल सुरू केला; पण विद्यार्थी नसल्याने हवा तसा धंदा नाही, अशी कैफियत शिंदे यांनी व्यक्त केली. 

स्पर्धा परीक्षेचे हब असलेल्या पुण्यात केवळ क्‍लासचीच संख्या वाढली असे नाही, तर त्यासोबत खाणावळी, चहा-नाश्‍त्याचे स्टॉल, पुस्तक विक्री, अभ्यासिका, वसतिगृह हे व्यवसायही बहरले. विशेष म्हणजे एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत सदाशिव पेठ, नारायण पेठ, नवी पेठ, कसबा पेठ, शुक्रवार पेठ, स्वारगेट, दत्तवाडी, पर्वती, डेक्कन जिमखाना, बुधवार पेठ या परिसरात 80 टक्के विद्यार्थी राहत. त्यामुळे येथील वसतिगृह असो की कॉट बेसिसचे दर वाढले. मोठ्या खाणावळींसह घरोघरी काकू-मावशींनीही खाणावळी सुरू केल्या. यातून कुटुंबासाठी मोठा हातभार लागत होता. विद्यार्थी संख्या वाढल्याने अनेकांनी फ्लॅट भाड्याने घेऊन मेस, वसतिगृह सुरू केली. क्‍लासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चहा-नाश्‍त्याचे स्टॉल सुरू झाले. दिवसभर तेथे विद्यार्थ्यांचा राबता असायचा. पुण्यातील सुमारे 10 हजार कुटुंबांचा व्यवसाय या विद्यार्थ्यांमुळे सेट झालेला होता. मात्र कोरोनाचा शिरकाव झाला आणि स्पर्धा परीक्षेचे विश्‍वच थांबून गेले. यावर अवलंबून असलेल्या अनेकांचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाल्याने कंबरडे मोडले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अभ्यासिकांचे भाडे थकले 
संपूर्ण पुण्यात साधारणपणे लहान मोठ्या मिळून सुमारे 600 अभ्यासिका आहेत. त्यातील 250 ते 300 अभ्यासिका मध्यवस्तीत आहेत. महिन्याला 700 रुपयांपासून ते 2 हजारांपर्यंत विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतात; पण लॉकडाउन सुरू झाल्यापासून अभ्यासिकाचालक आर्थिक अडचणीत आले आहेत. जागामालकांनी भाडे मागितल्याने अभ्यासिका बंद केल्या आहेत, तर काहींनी भाड्यामध्ये सवलती घेऊन जागा सोडलेल्या नाहीत. आर्थिक ताण वाढत असल्याने अभ्यासिका सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात होती; पण अद्यापही त्यास परवानगी दिलेली नाही. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्या 5 वर्षांपासून मी खाणावळ चालवत आहे. माझे कुटुंबही याच व्यवसायात आहे. रोज सकाळ-सायंकाळी किमान 250 विद्यार्थी जेवणासाठी येत; पण लॉकडाउनमुळे विद्यार्थी नसल्याने आमच्याच रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला होता. आता फक्त 25 डबे आहेत. ही स्थिती कधी सुधारणार माहीत नाह. 
- विजय हारदडे, खाणावळचालक 
 

आमचे मुलींचे वसतिगृह असून, पूर्वी 70 मुली राहत होत्या. मार्चपासून वसतिगृह बंद झाल्याने उत्पन्न बुडालेच. जागामालकाला पैसे द्यावे लागले. त्यामुळे दुप्पट नुकसान झाले. मागच्या महिन्यापासून दहा मुली राहत आहेत. त्यातून काही भागत नाही; पण व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी हा तोटा सहन करावा लागतोय. यातून लवकर सुटका व्हावी एवढीच अपेक्षा आहे. 
- विक्रम गायकवाड, वसतिगृहचालक 
 

मार्चआधी दिवसाला सव्वाशे लिटर दुधाचा चहा करून विकत होतो. आता 15 लिटर दूधदेखील जास्त होते. लॉकडाउनचा मोठा तोटा सहन करावा लागला. माझ्याकडे चहा पिण्यासाठी येणारे बहुतांश जण हे विद्यार्थी होते. आता ते पुण्यात नसल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे. 
- संतोष शास्तुरकर, चहा विक्रेता 
 

लॉकडाउनपूर्वी अशी होती स्थिती 
खाणावळी - सुमारे 700 
अभ्यासिका - सुमारे 600 
स्पर्धा परीक्षार्थी - 1 लाख 
खाणावळीसाठी पैसे - 2 हजार ते 4 हजार 
वसतिगृह - सुमारे 3500 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT