Work from home impact on women health 
पुणे

"वर्क फ्रॉम होम'मुळे जीवनशैलीच बिघडली; महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम

मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा

पुणे - तुम्ही "वर्क फ्रॉम होम' करत असला आणि त्यातही तुम्ही महिला असाल, तर "विकेंड' तुम्हाला आरामासाठीच असेल असे नाही बरं का! कारण विकेंडला ऑफिसचे काम जरी नसले, तरी घरातील कामांची भली मोठी यादी आमच्यासमोर पडलेली असते. त्यामुळे आमची जीवनशैलीच बदलून गेली आहे. उदासीनचा आणि ताण वाढला आहे, असा अनुभव आयटीमध्ये काम करणाऱ्या शीतल कोल्हे सांगत होत्या. "वर्क फ्रॉम होम'मध्ये होणारी तारांबळ त्यांनी "सकाळ'कडे व्यक्त केली. 

शीतल या गेल्या दहा-बारा वर्षांपासून आयटी क्षेत्रात काम करत आहेत. आपल्या लहान मुलाला सांभाळत सध्या त्या घरातूनच ऑफिसचे टार्गेट पूर्ण करत आहेत. कोरोनामुळे अनेक कंपन्यांनी आणि विशेषत: आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना "वर्क फ्रॉम होम'ची सवलत दिली आहे. यामुळे महिलांना घरासाठी अधिक वेळ देता येत आहे, असे वाटत असले तरी घरातील कामे आणि ऑफिसचे टार्गेट ही दोन्ही आव्हाने एकाच वेळी पेलावी लागत आहेत. त्यात विकेंडला सुटी मिळत असली, तरी पूर्वीसारखे (कोरोनापूर्वीची परिस्थिती) बाहेर फिरायला, हॉटेलिंग, शॉपिंग हे आता शक्‍य होत नसल्याचे महिला सांगतात. 

सॉफ्टवेअर डेव्हलपर असणाऱ्या रूपाली पाटील म्हणाल्या, "मला एक दहा वर्षांची मुलगी आणि एक वर्षाचे बाळ आहे. घरात नवरा, मी आणि दोन लहान मुले. सध्या मला घरातील सर्व कामे, मुलांचा सांभाळ आणि ऑफिसचे काम एकाच वेळी करावे लागत आहे. मध्यरात्रीपर्यंत जागून ऑफिसचे नियोजित काम पूर्ण करत आहे. त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. केस गळण्याचे प्रमाण वाढले असून, थायरॉइडची समस्याही वाढली आहे. रूपाली यांच्याप्रमाणेच आरोग्याविषयक अनेक समस्या जाणवू लागल्याचे निरीक्षण महिलांनी नोंदविले आहे. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

"वर्क फ्रॉम होम'चा आरोग्यावर परिणाम 
- चिडचिडेपणा, तणावात वाढ 
- रागाचा पारा चढतोय 
- केस गळतीची समस्या 
- पुरेशी झोप न मिळणे 
- आहाराकडे दुर्लक्ष 
- पुरेशी विश्रांती मिळेना 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अल्पना वैद्य म्हणाल्या... 
- "वर्क लाइफ बॅलन्स' करणे जवळपास 50 टक्‍क्‍यांहून अधिक महिलांना जातंय अवघड 
- कामाचे स्वरूप बदलल्याने घरात राहूनही काम संपत नाहीये 
- आपापसातील वाद वाढलेत. घरातील सुसंवाद हरवलाय 
- मुलांना सांभाळायचे असल्याने नोकरी करावी का नाही, अशी द्विधा मनस्थिती 
- नैराश्‍य, उदासीनता आणि ताण वाढला 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सर्वेक्षण काय सांगते... 
- "पिंक लॅडर'च्या सर्वेक्षणानुसार, "वर्क फ्रॉम होम' करणाऱ्या दहापैकी चार महिलांना उदासीनता आणि ताण जाणवत आहे. "पिंक लॅडर' ही 
महिलांच्या सर्वसमावेशक करिअरसाठीचे व्यासपीठ आहे. 
- "लिंकडीन वर्कफोर्स कॉन्फिडन्स इंडेक्‍स'ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, देशात काम करणाऱ्या महिलांपैकी 50 टक्के महिलांचा ताण कोरोनाच्या परिस्थितीमुळे वाढला आहे. जवळपास 47 टक्के महिलांचा ताण वाढला आहे. "वर्क फ्रॉम होम' करणाऱ्या जवळपास 46 टक्के महिलांचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असते, तर 42 टक्के महिला मुलांमुळे कामावर लक्ष केंद्रित करू शकत नसल्याची माहिती समोर येत आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

घरात बसून काम करत असल्यामुळे कामाचा ताण आहे. मुलगी लहान असल्याने तिच्याकडे लक्ष द्यावे लागते. शक्‍यतो सकाळी ती झोपेतून उठण्यापूर्वी मी काम सुरू करते. ती उठल्यावर तिचे आवरून पुन्हा कामाला सुरवात करते. ऑफिसचे काम सुरू असतानाही तिच्याकडे लक्ष द्यावे लागते. त्या वेळी चांगलीच तारांबळ उडते. 
- वर्षा गुरव, आयटीतील कर्मचारी 

देशातील नोकरदारांची आकडेवारी (टक्‍क्‍यांत : 
वर्ष : पुरुष : महिला 
2014 : 71 : 29 
2015 : 70 : 30 
2016 : 68 : 32 
2017 : 71 : 29 
2018 : 77 : 23 
2019 : 75 : 25 
(स्रोत : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावरील इंडिया स्किल रिपोर्ट-2019) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nomination Rejection News : भावी नगरसेवकांसाठी आजचा गेमचेंजींग दिवस, महापालिका निवडणुकीसाठी छाननी होणार, कोणाचे अर्ज होणार अवैध

Vijay Hazare Trophy: नाशिकचा गोलंदाज इतिहास घडवतोय! 'अशी' कामगिरी करणारा महाराष्ट्राचा पहिला गोलंदाज ठरला

Latest Marathi News Update : किल्ल्यांवर 'थर्टी फर्स्ट'ला बंदी गैरप्रकार टाळण्यासाठी वन विभागाकडून गस्त,बंदोबस्तात वाढ

Pregnancy Criminalization Case : बाळाचा गर्भातच मृत्यू, महिलेला १८ वर्षांची शिक्षा, पण आता या एका दाव्याने निकाल पलटला; नेमकं काय घडलं?

Happy New Year 2026 Wishes: नववर्ष 2026 ची सुरुवात करा प्रेमाने! मित्र-परिवाराला पाठवा मनापासूनच्या शुभेच्छा, वर्ष होईल खास

SCROLL FOR NEXT