Sakal-Furniture-and-Kitchen expo 2019
Sakal-Furniture-and-Kitchen expo 2019 
पुणे

‘सकाळ फर्निचर आणि किचन एक्‍स्पो’चे आजपासून सुरू

सकाळ वृत्तसेवा

पुणे - घरासाठी खरेदी म्हटले, की दोन गोष्टी मनात येतात. घरासाठी आवश्‍यक वस्तू आणि घरसजावटीसाठी आवश्‍यक वस्तू. आता या दोन्ही एकाच छताखाली खरेदी करता येणारा ‘सकाळ फर्निचर आणि किचन एक्‍स्पो’ सुरू होत आहे. असा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वेड लावणारा खरेदीचा महोत्सव गुरुवारपासून (ता. १२) सोमवारपर्यंत (ता. १६) असणार आहे. गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत हे प्रदर्शन असणार आहे.

कमी किमती, नवनवीन दर्जेदार उत्पादने आणि सवलतींचा पाऊस हे या ‘फर्निचर आणि किचन एक्‍स्पो’चे वैशिष्ट्य. एक्‍स्चेंज व डिस्काउंट ऑफर्ससह १०० हून अधिक कंपन्यांचे स्टॉल्स असणार आहेत. सोफा, फर्निचर, किचन अप्लायन्सेस अशा गोष्टींचा तर खजिनाच आहे. वूडन फर्निचर, फर्निशिंग, इंटेरिअर, मॉड्यूलर किचन, किचन चिमणीज, गार्डन फर्निचर आणि होम डेकॉर असणार आहेत. तसेच, खास गृहसजावटीमध्ये मॅट्रेसेस, चादरी, पडदे, फ्लॉवर पॉट्‌स, फ्रेम, आर्टिफिशिअल फुले, म्युरल्स आहेत. गारमेंट्‌स, फूड प्रॉडक्‍ट्‌स, नॉव्हेल्टीज, फॅशन ॲक्‍सेसरीज, लाइफस्टाईल प्रॉडक्‍टस, वेगवेगळे खाद्यपदार्थ, गिफ्ट्‌स यांचे स्टॉल्स खरेदीप्रिय पुणेकरांना सहज उपलब्ध होणार आहेत. आकर्षक बक्षिसे, ऑफर्स, फ्री गिफ्ट्‌स या फेस्टिव्हलमध्ये असणार आहे. पेटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डनेदेखील इथे खरेदी करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT