sakal impact sakal
पुणे

Sakal Impact : खड्डे बुजविण्यासाठी प्रशासन लागले कामाला

शहरात पाणी पुरवठा, सांडपाणी वाहिनी टाकताना खोदकाम केले होते. हे रस्ते दुरुस्तीनंतर लगेच खचले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याची तयारी महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. कर्वेनगर येथे खचलेला रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासह रस्त्यांची दुरुस्त करण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी व वाहतूक पोलिस शनिवारी (ता. ७) पाहणी करणार आहेत. (sakal impact pune corporation administration taking fill pits)

शहरात पाणी पुरवठा, सांडपाणी वाहिनी टाकताना खोदकाम केले होते. हे रस्ते दुरुस्तीनंतर लगेच खचले आहेत. त्यामुळे वाहनचालांनची तारांबळ उडाली आहे. हे खचलेले रस्ते दुरुस्त करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत होते. ‘सकाळ’ने शुक्रवारी ‘रस्त्यांची लेव्हल बिघडली’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने डोळे उघडले. त्याची दखल घेत कर्वेनगर येथे अलंकार पोलिस ठाणे ते चितळे बंधू चौकदरम्यान रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात आले आहे. पूर्वी या रस्त्यावर माती टाकून सिमेंट टाकण्यात आले होते. त्यामुळे हा रस्ता खचला होता.

मात्र आता ठेकेदाराने तेथे मुरूम टाकून रस्ते दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार म्हणाले, ‘‘शहरातील खड्ड्यांसंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी त्वरित खड्डे बुजविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या हॉटमिक्स प्लांटमधून डांबर घेऊन खड्डे बुजविण्याचे केले जाणार आहे. सध्या पाऊस नसल्याने दिवसा आणि रात्री देखील हे काम केले जाणार आहे.’’

बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता, शिवाजी रस्त्यावरील रस्त्याची परिस्थिती, वाहतूक कोंडीचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी शनिवारी पथ विभागाचे अधिकारी व वाहतूक पोलिस हे संयुक्तपणे पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT