pune sakal
पुणे

'जुन्नरच्या' तनिष्कांनी बांधले विधायक कामाचे रक्षासूत्र

सकाळ व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी तनिष्का भगिनींना रक्षासुत्र संदेशात दिल्या शुभेच्छा

सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : सकाळ (Sakal) माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) अभिजित पवार (Abhijit Pawar) यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधनाचे (Rakshabandhan) निमित्ताने जुन्नरच्या (Junnar) तनिष्कांनी विधायक कामाचे रक्षासूत्र बांधले .

स्त्रीशक्तीचा,भगिनी शक्तीचा सन्मान करण्यासाठी जुन्नर येथील तनिष्कांना विधायक कामात साथ देण्याचे बंधन म्हणून पवार यांनी पाठवलेल्या राख्या तनिष्कांनी एकमेकींना बांधल्या.

तनिष्का सदस्य म्हणून आपण करत असलेल्या कामाचा आम्हांला अभिमान आहे; समाजातील,कुटुंबातील स्नेह, स्थिरता, समाधान आणि भलेपणा कायम राखण्याचे सामर्थ्य तनिष्कांमध्ये आहे. राखीचा हा रेशीम धागा आपल्या सर्वांना पुढच्या दिशेकडे, समाजहिताच्या स्वप्नपूर्तीकडे नेणारा ठरेल अशा शुभेच्छा अभिजित पवार यांनी तनिष्का भगिनींना पाठवलेल्या रक्षासुत्र संदेशात दिल्या आहेत.

आपल्या सोबत आपल्या भगिनींना घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी विधायक कार्य करण्याचा विश्वास गटनेत्या उज्वला शेवाळे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केला. सुनिता वामन, सरिता कलढोणे यांनी आपल्या मनोगतात आजच्या कार्यक्रमातून एक नवी ओळख आणि जबाबदारी मिळाली तसेच अभिजित सरांनी दाखवलेला विश्वास सार्थ करण्याचा सर्व तनिष्का प्रयत्न करतील असे नमूद केले. मैत्रीला उद्देशून कविवर्य अनंत राऊत यांची गझल डॉ.वैशाली गायकवाड यांनी सादर केली.

जुन्नरच्या तनिष्का उज्वला शेवाळे, नगरसेविका मोनाली म्हस्के व हाजरा इनामदार, माधुरी म्हसकर, छाया शेवाळे, महानंदा हिरेमठ, ज्योती मेहेर, सुनिता वामन, पूनम तांबे, स्नेहल हांडे, प्रतिभा केदारी, मनीषा तिवारी, सरिता कलढोणे, पुष्पा बुट्टे, डॉ.वैशाली गायकवाड, मनिषा लोखंडे ,आशा केदारी, स्मिता हजारी, सुवर्णा वाव्हळ, अनिता ढोबळे, माया खत्री, सुजाता ढोबळे, कांचन बुट्टे , ज्योत्स्ना देशपांडे, निर्मला खिलारी यावेळीउपस्थित होत्या.सूत्रसंचालन प्रतिभा केदारी यांनी केले. डॉ. वैशाली गायकवाड यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT