sakal media group director bhausaheb patil passed away 
पुणे

'सकाळ'चे संचालक भाऊसाहेब पाटील यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सकाळ माध्यम समुहाचे संचालक (ऑपरेशन्स) भाऊसाहेब पाटील (वय 55) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. भाऊसाहेब पाटील यांचे मुळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील बामणी (ता. कागल). अंत्यसंस्कार बामणी येथे पहाटे होणार आहेत. 

पाटील यांनी सकाळमध्ये 34 वर्षे सेवा केली. ते 1986 मध्ये कोल्हापूर सकाळमध्ये प्रशिक्षणार्थी इंजिनियर म्हणून रुजू झाले. छपाईच्या पारंपरिक पद्धतीकडून संस्थेन नवीन तंत्रज्ञान रुजविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कोल्हापूरनंतर ते पुण्यात आले. त्यानंतरही सातत्याने सकाळच्या विविध विभागात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणले. सकाळ समुहातील प्रॉडक्‍शन विभागात सुधारणा आणि विस्तार करण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले.

संगणकाचा वापर वाढावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. विविध आवृत्त्यांसाठी प्रिटिंग प्रेस स्थापित करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. यामुळे छपाईचे काम वेगाने आणि दर्जेदार होऊन सकाळच्या वितरण प्रणालीत सुधारणा झाली. गोवा, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर येथे प्रिटिंग प्रेस सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. "सकाळ'च्या डिजिटल आणि विविध विभागातील तंत्रज्ञानाचा वापर यांसह वृत्तपत्रातील दर्जात्मक वृद्धीसाठी त्यांना वॅन इफ्राद्वारे सन्मानितही करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT