balewadi 
पुणे

पुण्यात बालेवाडीच्या क्वॉरंटाइन सेंटरमध्ये आला गरम नाष्टा; सुरू झाली स्वच्छता मोहीम

सकाळवृत्तसेवा

पुणे Coronavirus - कोरोनाचे रुग्ण आणि संशयितांचे यादीनिहाय विलगीकरण, गरम-गरम नाश्‍ता आणि जेवण, दिवसातून तीन वेळा स्वच्छता आणि देखमालीसाठी वाढविलेले कर्मचारी, अशा विविध उपाययोजना महापालिका प्रशासनाने बालेवाडी येथील संक्रमण शिबिरात मंगळवारी (ता.29) तातडीने केल्या. महत्त्वाचे म्हणजे, अनावश्‍यक नागरिकांना तेथून घरी जाण्याची तर काही जणांना काही अटींवर घरीच क्वारंटाइन राहण्याची मुभाही देण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

‘संक्रमण शिबिरे; रोगापेक्षा इलाज भयंकर’ अशा आशयाचे वृत्त ‘सकाळ’मध्ये मंगळवारी प्रसिध्द झाले. त्यात कोरोनाचे रुग्ण आणि संशयित यांना दोन-दोन दिवस एकत्र ठेवणे, पॉझिटिव्ह रुग्णांवर तातडीने उपचार सुरू न करणे, निकृष्ठ दर्जाचे जेवण साध्या कॅरीबॅगमधून देणे, अपुरी स्वच्छतागृहे अशा विविध गैरसोयींचा उहापोह करण्यात आला होता. त्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. सर्वप्रथम नाश्‍ता-जेवण पुरविणारा ठेकेदार बदलण्यात आला. त्या पाठोपाठ महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची गाडी आली आणि साफ-सफाई सुरू झाली तर दुसरीकडे पॉझिटिव्ह, निगेटिव रुग्णांच्या याद्या घेऊन महापालिका अधिकाऱ्यांनी विलगीकरण सुरू केले. त्यामुळे येथील अनागोंदी कमी होऊन सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळही थांबण्यास मदत झाली.दूसरीकडे गरज नसतांना तेथे ठेवण्यात आलेल्या 24 नागरिकांना घरी जाण्यास सशर्त परवानगी दिल्याने त्यांनीही सुटकेचा नि:श्‍वास सोडला. सहायक आरोग्य अधिकारी डॉ. जयंत कांबळे, डॉ. पाचूंदकर मॅडम, माजी नगरसेवक बाळासाहेब भामरे आदींनी याकामी पुढाकार घेतला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बालेवाडी संक्रमण शिबिरातील गैरसोयींची तातडीने दखल घेऊन तातडीने सुधारणा करण्यात येत आहेत. केटरर बदलण्यात आला असून स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांबाबत तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. मी स्वत: भेट देत देऊन पाहणी करतो. 
- राजेंद्र मुठे, उपायुक्त, पुणे महापालिका. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

'लाल लाल कलरची बांगडी...'नऊवारी साडी अन् मराठमोळा लूक, शिल्पा शेट्टीचा डान्स पाहिलात का? Viral Video

QR स्कॅन करण्यापासून ते खात्यात पैसे जमा होण्यापर्यंत, UPI नेमकं कसं काम करतं? वाचा पडद्यामागची संपूर्ण कहाणी

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Mumbai Ganeshotsav:लालबागच्या गर्दीवर रेल्वे पोलिसांचा वॉच: चिंचपोकळी, करी रोडवर २१९ आरपीएफ जवानांसह ५५ तिकीट तपासनीस

SCROLL FOR NEXT