Sakal Sobat Boluya
Sakal Sobat Boluya Sakal
पुणे

खासगी नोकरदारांचे ‘सकाळ सोबत बोलूया’ हेल्पलाइनवर सर्वाधिक फोन

सकाळ वृत्तसेवा

मानसिक ताणतणाव व्यवस्थापन व एकूणच मानसिक स्वास्थ्य व समस्यांच्या मार्गदर्शनासाठी ‘सकाळ सोबत बोलूया’ ही २४ तास मोफत हेल्पलाइन उपक्रम १९ महिन्यांपासून सुरू आहे.

पुणे - मानसिक ताणतणाव (Mental Stress) व्यवस्थापन व एकूणच मानसिक स्वास्थ्य व समस्यांच्या मार्गदर्शनासाठी ‘सकाळ सोबत बोलूया’ (Sakal Sobat Boluya) ही २४ तास मोफत हेल्पलाइन (Helpline) उपक्रम १९ महिन्यांपासून सुरू आहे. या हेल्पलाइनवर मदतीसाठी फोन करणाऱ्या लोकांमध्ये खासगी नोकरदार (Private Servant) वर्गाचे प्रमाण (३३.३ टक्के) पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच, आतापर्यंत राज्यभरातून १३ हजार लोकांनी हेल्पलाइनवर संवाद साधला आहे.

‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या वतीने we are in this together या मोहिमेअंतर्गत आणि कर्वे समाज सेवा संस्थेच्या सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डिसॲबिलिटीजच्या सहकार्याने मानसिक ताणतणाव व्यवस्थापन व एकूणच मानसिक स्वास्थ्य व समस्यांच्या मार्गदर्शनासाठी ‘सकाळ सोबत बोलूया’ ही २४ तास मोफत हेल्पलाइन उपक्रम १९ महिन्यांपासून सुरू असून तज्ज्ञ समुपदेशक, मानसिक विकारतज्ज्ञ, मानसशास्त्रतज्ज्ञ यांची टीम हेल्पलाइनवर फोन करणाऱ्या व्यक्तींना मानसिक आधार देत आहे. या हेल्पलाइनमुळे लोकांना व्यक्त होण्यासाठी व योग्य मार्गदर्शनासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

हेल्पलाइनवर फोन करणाऱ्यांमध्ये पुरुष वर्गाचे प्रमाण ६२.६ टक्के होते, तर महिला वर्गाचे प्रमाण ३७.२ टक्के होते. हेल्पलाइनवर येणाऱ्या कॉल्सच्या समस्यांमध्ये प्रामुख्याने काळजी, चिडचिडेपणा, मानसिक विकारांमुळे येणारा ताण व चिंता यामुळे येणारे नैराश्य यासंदर्भातील कॉल्सचे प्रमाण ४४.८ टक्के होते.

नातेसंबंधातील ताणतणाव, वैवाहिक सहजीवनामधील समस्या, एकतर्फी प्रेमामुळे येणाऱ्या नैराश्याचे प्रमाण १९.७ टक्के होते.

नोकरी व व्यवसायातील आर्थिक अडचणींमुळे आलेल्या नैराश्याचे प्रमाण ८.७ टक्के होते. तसेच आनुवंशिक आजार, मानसिक आरोग्याच्या समस्या, कोरोनामुळे आलेले नैराश्य या यासंदर्भातील कॉल्सचे प्रमाण त्याखालोखाल होते.

समुपदेशनासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट

काही लोकांना सातत्याने समुपदेशन व मार्गदर्शन सेशन्सची गरज असते, असे निदर्शनास आले. ही गरज लक्षात घेऊन चिंता, काळजी, एकटेपणा, नातेसंबंधातील ताणतणाव व वैवाहिक सहजीवनातील समस्यांमुळे येणारा मानसिक ताण व नैराश्यामुळे उद्‌भवणाऱ्या मानसिक समस्यांवर सर्व वयोगटातील नागरिकांसाठी नाममात्र सशुल्क दरात तज्ज्ञ समुपदेशकांचे मार्गदर्शन घेण्याकरिता we are in this together या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अपॉइंटमेंट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याद्वारे आपल्या सोयीनुसार, वेळेनुसार तज्ज्ञ समुपदेशकांची अपॉइंटमेंट नागरिकांना बुक करता येईल.

वेबसाइटला भेट द्या...

चला तर मग, आपणही आमच्याशी बोलू शकता. ‘सकाळ सोबत बोलूया’ ०२०-७११७१६६९ या क्रमांकावर फोन करून आमच्याशी मनमोकळेपणाने बोला. आपली व्यक्तिगत माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.

असे करा ऑनलाइन बुकिंग

खालील लिंक ओपन करून आपली व्यक्तिगत माहिती भरून आपण अपॉइंटमेंट बुक करू शकता.

लिंक - www.waitt.in/therapy/

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT