sugran competition sakal
पुणे

लयभारी महिला ग्रुपच्या पुढाकाराने १०० आदिवासी महिलांचा सुगरण स्पर्धेत सहभाग.

महिलांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले असल्याचे मोहरे यांनी यावेळी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

फुलवडे : फुलवडे ता. आंबेगाव येथील लयभारी महिला ग्रुप व सह्याद्री आदिवासी नोकरदार मंडळाच्या पुढाकाराने सकाळ समूहाने महिलांसाठी सुरू केलेल्या सुगरण स्पर्धेविषयी महिलांना मार्गदर्शन करून गावातील १०० महिलांना या स्पर्धेत सहभागी करून स्पर्धेचे उदघाटन गावच्या सरपंच मनीषा नंदकर व ग्रामसेविका आशा मुंढे यांच्या उपस्थितीत करण्यात आल्याची माहिती लयभारी महिला ग्रुपच्या अध्यक्षा राजश्री मोहरे यांनी दिली.

सकाळ समूहाच्या सुगरण या सदरातून पाक कलेविषयी व आरोग्य विषयक मोलाचे मार्गदर्शन महिलांना लाभणार असून त्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. त्याप्रमाणे स्पर्धेत विचारलेल्या प्रश्नांचे अचूक उत्तर देऊन आकर्षक बक्षीसे मिळणार असल्याने महिलांची उत्सुकता वाढणार असून या स्पर्धेत रंगत येणार आहे. आदिवासी दुर्गम भागातील महिलांना शेतीच्या कामातून थोडीशी उसंत मिळून मनोरंजनात्मक खेळातून आनंद मिळणार आहे. त्यामुळे अधिकाधिक महिलांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले असल्याचे मोहरे यांनी यावेळी सांगितले.

उदघाटन प्रसंगी चंद्रभागा बांबळे, यमुना जंगले, जयश्री गभाले, कल्पना हिले, सिंधुबाई मोहरे, सुनंदा मोहरे, सुमित्रा मोहरे, कुंदा हिले, आशा सातपुते, सुभद्रा नंदकर, अपेक्षा बांबळे, पूजा मोहरे, आरती मोहरे, तबाबई बांबळे, आशा गवारी आदी महिला उपस्थित होत्या.

"सुगरण पाककला स्पर्धेच्या निमित्ताने सकाळने खूप छान उपक्रम आयोजित केला असून महिलांच्या मोठ्या प्रमाणात मिळालेल्या सहभागातून महिलांची एकी दिसून येत आहे. महिला सक्षमीकरणा साठी हे एक पाऊल ठरू शकते. पाककला व आरोग्याबाबत मार्गदर्शन मिळाल्याने महिलांमध्ये जागृती होऊन त्याचा फायदा कौटुंबिक आरोग्य सुधारण्यास होईल."

- सुधीर घोटकर, अध्यक्ष, सहयाद्री नोकरदार मंडळ फुलवडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT