sakal vastu expo 2022 start in baner today  sakal
पुणे

‘सकाळ वास्तू एक्स्पो’ आजपासून; घर खरेदीदारांसाठी मोठी संधी

बाणेरमध्ये आयोजन; सुशील जाधव यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ची सुरुवात आजपासून बाणेरमध्ये सुरुवात होत आहे. पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते व ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’चे पुणे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‍घाटन शनिवारी (ता. ४) सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे.

दोन दिवस चालणारे हे प्रदर्शन बाणेर रस्त्यावरील भारत पेट्रोलियम पंपाजवळ माऊली गार्डन येथे भरणार आहे. तसेच, एक्स्पोमध्ये इच्छुक खरेदीदारांसाठी घरकर्जाची माहिती व सोय उपलब्ध करून देणारे स्टॉल्सही असतील. हे एक्स्पो वातानुकूलित असून तिथे पार्किंग व प्रवेश मोफत आहे. एक्स्पोच्या माध्यमातून पुणे महानगरातील सर्व उपनगरांमधील गृहप्रकल्पांचे विविध पर्याय फ्लॅट, बंगलो, रोहाऊस, रिडेव्हपलपमेंट प्रकल्पातील आरामदायी सदनिकांसह एन.ए. प्लॉटची माहिती ग्राहकांना इथे मिळणार आहे.

पुणे महानगरातील वीसहून अधिक विकसकांचे ७५हून अधिक प्रकल्पांमधील घरांचे पर्याय इथे ग्राहकांना पाहता येतील. योग्य किमतीतील, मोठ्या व आरामदायी घरांचे पर्याय या सकाळ वास्तू एक्स्पोच्या माध्यमातून इच्छुक घर खरेदीदारांना निवडता येणार आहेत. ‘लोकमान्य सोसायटी’ या एक्स्पोचे फायनान्स पार्टनर म्हणून सहभागी होत आहेत.

प्रदर्शनाविषयी...

कधी : शनिवार (ता. ४) व रविवारी (ता. ५)

कुठे : बाणेर रस्ता, भारत पेट्रोलियम पंपाजवळ, माऊली गार्डन

वेळ : सकाळी ११ ते रात्री ८

प्रवेश व पार्किंग : मोफत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

SCROLL FOR NEXT