Sakal Vastu Plotting Expo 2024 sakal
पुणे

Sakal Vastu Plotting Expo : ‘सकाळ वास्तू प्लॉटिंग एक्स्पो’ आजपासून

बदलत्या काळानुसार गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध असले तरी जमिनीमध्ये गुंतवणुकीचा परतावा चांगल्या प्रमाणात असतो, हे स्पष्ट झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बदलत्या काळानुसार गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध असले तरी जमिनीमध्ये गुंतवणुकीचा परतावा चांगल्या प्रमाणात असतो, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच गुंतवणूकदार प्लॉटमधील गुंतवणुकीला प्राधान्य देतात. तसेच, सेकंड होममध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे ‘सकाळ वास्तू प्लॉट एक्स्पो’चे शनिवार (ता. २२) आणि रविवारी (ता. २३) आयोजन करण्यात आले आहे.

एक्स्पोचे उद्‌घाटन शनिवारी (ता. २२) सकाळी ११ वाजता पुणे स्मार्ट सिटीचे सीईओ तथा पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते यांच्या हस्ते होईल. सेकंड होमसोबतच अनेकजण प्लॉट्‌समध्ये गुंतवणूक करतात. त्यातही आता अनेकविध संकल्पनांमुळे ही गुंतवणूक अधिक फलदायी झाली आहे. त्या अनुषंगाने आवड व बजेटनुसार अनेकविध पर्याय २५हून अधिक विकसकांचे ५०हून अधिक प्लॉटिंग, सेकंड होम व जमिनीचे प्रकल्प असतील.

पुणे शहर विस्तारत आहे. चारही दिशांना प्लॉटिंगचे पर्याय विस्तारत आहेत. उपनगरांत आणि शहरापासून काही अंतरावर निसर्गरम्य ठिकाणी सेकंड होमचा पर्याय वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना एकाच छताखाली सर्व पर्याय पाहता यावेत आणि त्यातून खरेदी करता यावी, यासाठी या उद्देशाने हा एक्स्पो आयोजित करण्यात आला आहे.

  • कधी : शनिवार (ता. २२) व रविवार (ता. २३) जून

  • कुठे : सोनल हॉल, कर्वे रोड, पुणे

  • वेळ : सकाळी १० ते रात्री ८

  • अधिक माहितीसाठी संपर्क : ९७६४६ ७२४३१

  • पार्किंग व प्रवेश मोफत

‘सकाळ’ वास्तू एक्स्पो आम्हाला रॉयल पुरंदर प्रोजेक्ट प्रदर्शित करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ प्रदान करत आहे. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या प्रोजेक्ट्समध्ये फार्महाऊस आणि बंगलोज पाहायला भेटतील. तसेच ॲग्रिकल्चर आणि एनए प्लॉट्सचे पर्याय पुण्यापासून काही अंतरावर आहेत. ज्यामध्ये सर्व पायाभूत सुविधा सुसज्ज आहेत.

- राजेश कोठारी, ग्रुप सीईओ, रॉयल पुरंदर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission: बिहारमधील गोंधळानंतर आता निवडणूक आयोगाने ‘SIR’बाबत घेतला मोठा निर्णय!

IND vs ENG 4th Test: इंग्लंडचे 'Root' भक्कम! जो रूटची १५० धावांची खेळी, अनेक विक्रम अन् भारताविरुद्ध मोठी आघाडी

Radhanagari Dam : राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Shashikant Shinde : सध्याचे सरकार हे राज्याची तिजोरी रिकामी करून आलेले सरकार; महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे दिले आदेश

Narayangaon Crime : लूटमार करणाऱ्या तीन गावगुंडांवर गुन्हा दाखल; दोन आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT