Sakal Vidya Education Expo 2024 Baramati sakal
पुणे

Sakal Vidya Education Expo : ‘सकाळ एज्युकेशन एक्स्पो’ करिअर घडविण्यासाठी उपयुक्त

‘करिअर घडविण्यासाठी परिपूर्ण मार्गदर्शन देण्याच्या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने आयोजित तीन दिवसांचे ‘सकाळ एज्युकेशन एक्स्पो’ उपयुक्त आहे.

सकाळ वृत्तसेवा

बारामती - ‘करिअर घडविण्यासाठी परिपूर्ण मार्गदर्शन देण्याच्या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने आयोजित तीन दिवसांचे ‘सकाळ एज्युकेशन एक्स्पो’ उपयुक्त आहे,’ असे गौरवोद्‌गार विविध मान्यवरांनी काढले.

बारामतीत ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट प्रायोजित व १७२९ आचार्य ॲकॅडमी प्रा. लि. प्रस्तुत ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४’चे ७, ८ व ९ जून रोजी आयोजन केले आहे. या एक्स्पोचे सहप्रायोजक पेस आय आय टी अँड मेडिकल बारामती असून, सहयोगी प्रायोजक दत्तकला शिक्षण संस्था भिगवण व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. या एक्स्पोचे उद्‍घाटन शुक्रवारी (ता. ७) मुक्ताई लॉन्स येथे झाले.

बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, आयएसएमटीचे उपाध्यक्ष किशोर भापकर, बारामती दूध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे सत्यम पवार, आचार्य ॲकॅडमीचे नीलेश बनकर, दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रमुख रामदास झोळ, पेस आयआयटी अँड मेडीकलचे शाझेब सय्यद व साकीब सय्यद, पुणे जिल्हा बँकेचे संदीप जगताप, सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे आनंद होळकर, सचिव भारत खोमणे, प्राचार्य संजय देवकर, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे सचिन शिंदे, डी. वाय. पाटील विद्यापीठ पुण्याचे प्रा. अक्षय काशीद, दिशा ॲकॅडमीचे राहुल प्रकाश, माळेगावचे कार्यकारी संचालक अशोक पाटील, शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय ठोंबरे, प्राचार्य शैलेंद्रकुमार मुकणे, एक्स्लेन्स सायन्स ॲकॅडमीचे सूर्यकांत सावंत, मोशन अॅकॅडमीचे संचालक संदीप पवार, लडकत सायन्स अॅकॅडमीचे संचालक नामदेव लडकत, तिरंगा कॉलेज ऑफ अॅनिमेशन अँड व्हीएफएक्सचे रणजित शिंदे, वैभव फाळके, व्हीआयआयटीचे संचालक आनंद देशमुख, प्राचार्य डॉ. सुमन देवमरुठ, प्राचार्या राजश्री पाटील, बन्सल क्लासेसचे प्रदीप घेगडे, बारामती फार्मसी कॉलेजचे कृष्णा बावकर, फ्युएल बिझनेस स्कूलचे जयेश पाटील, एमआयटी आळंदीचे वैभव भोंग, करिअर मार्गदर्शन हेमचंद्र शिंदे, प्रा. मनोज वाबळे, डॉ. नीता दोशी, बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष श्यामराव राऊत, डॉ. मनोज खोमणे, सदानंद करंदीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आजचे सेमिनार

  • मार्गदर्शक- रामदास झोळ, विषय- व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया व शिष्यवृत्ती, वेळ- सायंकाळी ४ ते ५.

  • मार्गदर्शक- आर. जी. बिरादार, विषय- इंजिनिअरिंगला प्रवेश घेताना काय काळजी घ्यावी, वेळ- सायंकाळी ५ ते ६.

  • मार्गदर्शक- विशाल घिगे, विषय- व्यक्तिमत्त्व विकास, वेळ- सायंकाळी ६ ते ७

दरवर्षी सकाळच्या वतीने आयोजित केला जाणारा सकाळ एज्युकेशन एक्स्पोचा उपक्रम स्तुत्य आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना एकाच दालनात विविध अभ्यासक्रमांच्या संधींची माहिती मिळते. विद्यार्थी व पालकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी.

- हेमचंद्र शिंदे, करिअर मार्गदर्शक, बारामती

ग्रामीण भागातील मुले हुशार असतात, पण योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने रस्ता चुकण्याची शक्यता असते. ‘सकाळ’च्या एक्स्पोमध्ये पुणे, बारामती, इंदापूर आदी विविध ठिकाणची डिप्लोमा, डिग्री, एमबीए, सायन्स अशा कोर्सची महाविद्यालये, विविध अॅकॅडमी, ॲनिमेशन कोर्स यासह विविध शैक्षणिक कोर्सची माहिती एका छताखाली उपलब्ध केली आहे. विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला.

- पी. बी. जगताप, मुख्याध्यापक, सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर

नेमक्या प्रवेशाच्या वेळी पालक चिंतेत असतात. खूप ठिकाणी माहिती घेत वणवण फिरावे लागते. सकाळच्या एज्युकेशन एक्सपोमध्ये मी स्वतः सर्व स्टॉलला भेट दिली, तेव्हा सगळी माहिती एका छताखाली मिळतेय, हे लक्षात आले. करिअर मार्गदर्शकदेखील मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. आता प्रवेश घेऊ इच्छिणारे व भविष्यात प्रवेशाची गरज असणारे विद्यार्थी पालक यांनी अवश्य भेट द्यावी.

- मोहन कोकरे, मुख्याध्यापक, खंडोबाचीवाडी माध्यमिक विद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST 2.0: जीएसटी शून्य केला, तरीही विमा महागणार? नव्या अहवालामुळे सर्वसामान्य ग्राहक चिंतेत

Maratha-OBC Reservation : आरक्षणाचा वाद पेटविण्याचा सरकारचा डाव : रोहित पवार

Prajwal Revanna Jail Job : माजी पंतप्रधानांचा बलात्कारी नातू आता पुस्तकं वाटणार; तुरुंगात मिळाली लायब्ररी क्लार्कची नोकरी, रोज मिळणार 'इतका' पगार

Lingayat Community : लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा हिस्सा मानू नका, सर्वोच्च संस्थेच्या आवाहनाने राजकारणात खळबळ

US Open 2025 : कार्लोस अलकाराजने जिंकला सहावा ग्रँड स्लॅम, जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी

SCROLL FOR NEXT