Sakal Vidya Education Expo 2024 sakal
पुणे

Sakal Vidya Education Expo : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण मार्गदर्शन

बारामतीत सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४’ चे आयोजन

सकाळ वृत्तसेवा

बारामती - आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या दहावी व बारावीनंतर नेमके काय करायचे, कोणते करिअर निवडायचे, कोणत्या क्षेत्रात अधिक संधी आहे, यासह इतरही अनेक विषयांवर एकाच छताखाली परिपूर्ण मार्गदर्शन व माहिती मिळवून देण्याची सोय सकाळ माध्यम समूहाच्या वतीने करण्यात आली आहे.

बारामतीत ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट प्रायोजित व १७२९ आचार्य ॲकॅडमी प्रा. लि. प्रस्तुत सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४ चे ७, ८ व ९ जून रोजी आयोजन करण्यात आले आहे. या एक्स्पोचे सहप्रायोजक पेस ॲकॅडमी, बारामती असून सहयोगी प्रायोजक दत्तकला शिक्षण संस्था, भिगवण आहे.

नीट, जेईई मेन्स, अभियांत्रिकी, एनडीए यांसह इतरही अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासह पुढील जीवनात या शिक्षणानंतर काय संधी उपलब्ध आहेत याची माहिती या एक्स्पोच्या दालनात विद्यार्थी व पालकांना दिली जाणार आहे. परदेशी शिक्षणासाठी अर्थसाहाय्य हवे असल्यास त्याचीही माहिती सहजतेने मिळणार आहे.

या एक्स्पोदरम्यान दररोज भाग्यवंत विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षीसे दिली जाणार आहेत. काही मान्यवरांची या तीन दिवसांत व्याख्यान होणार असून त्यांच्याकडून विद्यार्थी व पालकांचे शंका निरसनही केले जाणार आहे.

स्टॉल नोंदणीसाठी संपर्क -

  • दत्तात्रेय- ८९७५६७३३१०

  • रमेश- ८२०८५३९९४२.

एक्स्पोबाबत...

  • काय- सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४

  • कधी- शुक्रवार ता. ७ ते रविवार ९ जून २०२४

  • केव्हा- सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत

  • कुठे- मुक्ताई लॉन्स, सिटीईन चौक, सूर्यनगरी, बारामती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Electricity Rate: घरगुती ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीजदरात मोठी कपात जाहीर; नवे दर किती अन् कधी लागू होणार?

IPL 2026: विराट-धोनी आमने सामने येणार नाहीतच! MS Dhoni च्या खेळण्याबाबत नवी अपडेट समोर

Nagpur Bhosale Descendants : शिवरायांशी नागपूरच्या भोसले घराण्याचे नाते काय? नव्या पिढीचे वंशज आता काय करतात? पाहा वीरांचा वारस

Aniket Verma Inspirational Jounery : ३ वर्षांचा असताना आईचे निधन; वडिलांचे दुसरे लग्न... हार्दिक पांड्याची 'मॅगी' स्टोरी अन्...

MLC Election: एकनाथ शिंदे विधान परिषदेवर कोणाला पाठवणार? शिवसेनेच्या २ महिला चेहऱ्यांमध्ये जबरदस्त टक्कर; कुणाची लॉटरी लागणार?

SCROLL FOR NEXT