Sakal Vidya Education Expo 2024 sakal
पुणे

Sakal Vidya Education Expo : बारामतीत उद्यापासून सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो

उज्ज्वल करिअरची निवड करण्याच्या दृष्टीने दहावी बारावीनंतर करिअरच्या असलेल्या विविध संधीची माहिती एकाच छताखाली.

सकाळ वृत्तसेवा

बारामती - उज्ज्वल करिअरची निवड करण्याच्या दृष्टीने दहावी बारावीनंतर करिअरच्या असलेल्या विविध संधीची माहिती एकाच छताखाली विद्यार्थी व पालकांना मिळवून देण्यासाठी सकाळ माध्यम समूहाच्या वतीने शुक्रवारपासून (ता. ७) तीन दिवसीय (७, ८ व ९ जून २०२४) सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पोचे बारामतीत आयोजन करण्यात आले आहे.

महाविद्यालयीन प्रवेश, दहावी बारावीनंतर शिक्षणाच्या उपलब्ध पर्यायाची तसेच कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषध निर्माणशास्त्र, तंत्र शिक्षण, कृषी, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान यासह अनेक अभ्यासक्रमांची माहिती एकाच छताखाली विद्यार्थी व पालकांना या एक्स्पोच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

करिअर निवडताना पालक व विद्यार्थ्यांना अनेकदा संदिग्धता असते, कोणते क्षेत्र निवडावे, त्यात कोणत्या संधी आहेत याची माहिती या एक्स्पोच्या दालनात तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे. या क्षेत्रातील मान्यवर तीन दिवसांच्या या एक्स्पोमध्ये बहुमूल्य मार्गदर्शन करतील.

काय केव्हा कधी कुठे

  • काय- सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४

  • कधी- शुक्रवार ता. ७ ते रविवार ९ जून २०२४

  • केव्हा- सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत

  • कुठे- मुक्ताई लॉन्स, सिटीईन चौक, सूर्यनगरी, बारामती.

अधिक माहितीसाठी संपर्क

दत्तात्रेय- ८९७५६७३३१०

रमेश- ८२०८५३९९४२.

एक्सलन्स सायन्स ॲकॅडमी शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना IIT-JEE, NEET, MHT-CET, NDA अशा परीक्षांची तयारी करून घेण्यासोबतच एक उत्कृष्ट व्यक्ती बनविण्याचे काम करते. याचेच फलित म्हणून आमच्याकडे बारामती, सातारा, शिरूर, पुणे, सोलापूर, धाराशिव, पिंपरी चिंचवड, अहिल्यानगर अशा ठिकाणाहून शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. यंदा सहा विद्यार्थ्यांनी NEET परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात ६५० हुन अधिक गुण संपादन केले आहेत. ३० पैकी २१ विद्यार्थ्यांनी IIT-JEE परीक्षेमध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत.

- प्रा. गौरव गुंदेचा, संस्थापक, एक्सलन्स सायन्स ॲकॅडमी, बारामती

जीवनात यशासाठी उच्च शिक्षण महत्त्वाचे आहे. उत्तम संस्थेतून शिक्षण घेणे आवश्यक आहे. दहावी आणि बारावीनंतर पुरेशा माहितीअभावी विद्यार्थ्यांना नीट करिअर करता येत नाही. सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पोच्या माध्यमातून परिपूर्ण मार्गदर्शनाची संधी मिळणार आहे. डेलॉनिक्स सोसायटीचे बारामती कॉलेज ऑफ फार्मसी विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील सर्वोत्तम ज्ञान देण्यास सदैव कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांना हमखास प्लेसमेंट मिळण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे बारामती कॉलेज ऑफ फार्मसी हे आता सर्वश्रुत आहे.

- डॉ. राजेंद्र पाटील (प्राचार्य), डेलोनिक्स सोसायटीचे बारामती कॉलेज ऑफ फार्मसी, बऱ्हाणपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

72-Year-Old Paragliding : आजोबांनी Gen-Z लाही लाजवलं ! वयाच्या ७२व्या वर्षी घेतली आकाशात झेप, २४ हजार फूट उंचीवरून पॅराग्लायडिंग, VIDEO VIRAL

IND vs AFG 3rd T2OI: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केलाय एक बदल; जाणून घ्या संघ

Crime News: धक्कादायक! चार वर्षीय चिमुकलीसोबत ८५ वर्षीय वृद्धाचे अश्लील कृत्य, डोंबिवलीत संतापाची लाट

Latest Marathi News Update : नागपूरच्या अजनी चौकात ‘आशीर्वाद का दीया’ अभियान; दीपोत्सवाला मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

Kasari Power Protest: गणेशोत्सवात अखंडित विजेसाठी कासारी ग्रामस्थांचे महावितरणला साकडे; पोतराज आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT