Sakal Vidya Education Expo 2024 sakal
पुणे

Sakal Vidya Education Expo : सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो आजपासून; नामांकित शिक्षण संस्थांचा सहभाग

‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने आयोजित ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४’ हे तीन दिवसीय शैक्षणिक प्रदर्शन शुक्रवारपासून (ता.७) सुरू होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने आयोजित ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४’ हे तीन दिवसीय शैक्षणिक प्रदर्शन शुक्रवारपासून (ता.७) सुरू होत आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. केशव तुपे यांच्या हस्ते शुक्रवारी डी. पी. रस्ता येथील पंडित फार्म्स येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. या प्रदर्शनात राज्यातील जवळपास ३५ हून अधिक नामांकित शिक्षण संस्थांमधील विविध पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थी-पालकांना घेता येणार आहे.

‘सकाळ’तर्फे आयोजित हे शैक्षणिक प्रदर्शन ७, ८ आणि ९ जून दरम्यान भरविण्यात आले आहे. ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’चे निकमार युनिव्हर्सिटी हे ‘पॉवर्ड बाय स्पॉन्सर’ आहेत तर भारती विद्यापीठ, डीईएस पुणे विद्यापीठ, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी आणि सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट हे ‘असोसिएट स्पॉन्सर’ आहेत. मराठवाडा मित्र मंडळ व सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी हे ‘को-स्पॉन्सर्स’ आहेत.

तुमच्या मनातील प्रश्न सुटणार

पदवी, पदविका, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह व्यावसायिक कौशल्यावर आधारित मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत आहात का? अभ्यासक्रम निवडताना मार्गदर्शन, सल्ला हवा आहे; पण कोणाकडून मार्गदर्शन मिळवायचे?, योग्य सल्ला घेण्यासाठी कुठे जायचे?, असे असंख्य प्रश्न तुमच्या मनात आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’मध्ये मिळणार आहेत. चला तर मग, तुम्हीही या शैक्षणिक प्रदर्शनाला भेट द्या.

एक्स्पोबाबत

  • कधी : ७, ८, ९ जून २०२४

  • केव्हा : सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत

  • कुठे : पंडित फॉर्म्स, डीपी रस्ता, कर्वेनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT