Sakal Vidya Expo 2022 opportunities after 10th 12th Experts in field of education  sakal
पुणे

सकाळ विद्या एक्स्पो : दहावी, बारावीनंतरच्या संधी जाणून घ्या

‘सकाळ विद्या एक्स्पो’ला सुरुवात : शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गेली दोन वर्षे कोरोनामुळे सर्व काही ऑनलाइन असल्याने शैक्षणिक प्रवेशही ऑनलाइन घ्यावे लागत होते. मात्र, आता सर्व काही सुरळीत होत असताना ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो : २०२२’चे आयोजन होत आहे. विद्यार्थी आणि पालकांना इथे प्रत्यक्ष भेट देऊन पुढील पर्यायांबद्दल माहिती घेणे शक्य होत आहे. त्यामुळे हे प्रदर्शन त्यांच्यासाठी उपयुक्त आहे, असा सूर शैक्षणिक क्षेत्रांतील तज्ज्ञांनी व्यक्त केला.

दहावी-बारावीनंतरच्या करिअर संधींची माहिती विद्यार्थी आणि पालकांना देण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे शुक्रवारी त्याच्या उद्घाटनाप्रसंगी हा सूर व्यक्त झाला. विश्वकर्मा युनिव्हर्सिटीजचे संस्थापक व कुलपती डॉ. भरत अग्रवाल, सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. संजय चोरडीया, सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे संस्थापक-संचालक संतोष रासकर, एपीजी लर्निंगचे निनाद पानसे, अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे आनंद गंटेलू, एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटीचे स्वप्निल शिरसाठ, सिंबायोसिस स्किल्स ॲण्ड प्रोफेशनल युनिर्व्हसिटीचे अंकित गायधनी व दैनिक ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस आदी उपस्थित होते.

विश्वकर्मा युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘सकाळ विद्या एक्स्पो : २०२२’ ला सिंबायोसिस स्किल्स ॲण्ड प्रोफेशनल युनिर्व्हसिटीचे सौजन्य आहे. तर सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, अजिंक्य डी. वाय. पाटील युनिर्व्हसिटी आणि सृजन कॉलेज ऑफ डिझाईन यांचे सहयोग सौजन्य आहे. हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. ५)सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत सर्वांसाठी खुले असेल.

हे चुकवू नका...

  • ‘स्किल-बेस्ड डिग्री प्रोगामद्वारे उपलब्ध करिअर संधी’ : सागर भडंगे, सिंबायोसिस स्किल्स ॲण्ड प्रोफेशनल युनिर्व्हसिटी : सकाळी ११.३० ते दुपारी १२.३०

  • ‘की ऑफ करिअर सक्सेस’ : डॉ. संजय चोरडिया, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट : सायंकाळी ५ ते ५.४५

  • ‘डिझाइनच्या क्षेत्रातील सर्वोत्तम करिअर संधी’ : संतोष रासकर, सृजन कॉलेज ऑफ डिझाइन : सायंकाळी ६ ते ७

कोण काय म्हणाले...

डॉ. मंगेश कराड (कार्याध्यक्ष व कुलगुरू, एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे) : एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ शिक्षण क्षेत्रातील बदल स्वीकारत जागतिक दर्जाचे शिक्षण देशातील विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी पुढाकार घेत आहे. या विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध विद्याशाखांत जागतिक दर्जाचे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम राबविले जात आहे. सकाळ माध्यम समूहाने या प्रदर्शनाच्या माध्यमातून पालक आणि विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली असून याचा त्यांनी लाभ घ्यावा.

स्वाती मुजुमदार (प्र-कुलगुरू, सिंबायोसिस स्किल्स ॲण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी) : विद्यार्थ्यांसाठी हा एक्स्पो अत्यंत महत्त्वाचा आणि उपयोगी ठरत असतो. हे प्रदर्शन ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना दहावी, बारावीनंतर त्यांच्या आवडीच्या आणि उपलब्ध असणाऱ्या पर्यायांची माहिती देते. सर्व शैक्षणिक पर्यायांची माहिती विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी मिळते. तसेच त्या पर्यायांबद्दल प्रश्न ते सहजतेने विचारू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात करिअरबाबत असलेल्या शंकांचे निराकरण होते.

संगीता पाटील (शिक्षिका) : ‘सकाळ’ने विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा हा उपक्रम सुरु केला आहे. करिअरच्या किती विविध प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत, हे इथे आल्याशिवाय समजत नाही. कला, विज्ञान, वाणिज्य या शाखांपलीकडे जात इतरही अनेक गोष्टी करता येऊ शकतात, हे दाखवण्यासाठी मी माझ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी घेऊन आले आहे.

वंदना टीजगे (पालक) : एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग यासह परदेशात शिक्षण घेण्यासाठी विविध कोर्सेसची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. याची सविस्तर माहिती या ठिकाणी मिळते. या प्रदर्शनात नामवंत संस्था सहभागी झाल्यामुळे विद्येच्या माहेरघरात विद्यार्थी व पालकांसाठी एक नामी संधी उपलब्ध झाली आहे.

ओम होनरा (विद्यार्थी) : शिक्षण क्षेत्रात काय बदल होत आहेत, नवीन कोणते अभ्यासक्रम सुरू झाले, त्यातून आमचा काय फायदा होणार आहे, या सगळ्या बाबींची उत्तरे या प्रदर्शनाद्वारे एकाच ठिकाणी मिळते आहे. त्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी फायद्याचा आहे.

गौरी पैठणकर (विद्यार्थी) : सर्व नामवंत संस्थांना प्रत्यक्ष भेट देणे, शक्य नसते. भेट द्यायचे ठरवले, तरी त्यात खूप वेळ जातो. शिवाय प्रत्येक संस्थेत प्रत्येक अभ्यासक्रमाचे विभाग वेगवेगळे असतात. त्यामुळे त्यांची सखोल माहिती घेता येत नाही. मात्र, या प्रदर्शनातून नामवंत संस्था एकत्र आल्याने सर्व अभ्यासक्रमांची सखोल माहिती घेता येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT