पुणे

साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी ९६७ कोटींची ई-निविदा

CD

‘साकळाई’साठी ९६७ कोटींची ई-निविदा

नगर तालुका, ता. १४ ः नगर आणि श्रीगोंदा तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेच्या विविध कामांसाठी कुकडी पाटबंधारे विभागाने तब्बल ९६७ कोटी ७ लाख ३२ हजार रुपयांची ई-निविदा प्रसिद्ध केली आहे. यामुळे योजनेच्या प्रत्यक्ष कामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे. पाटबंधारे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे योजनेला गती मिळणार आहे.
साकळाई उपसा सिंचन योजनेअंतर्गत चिखली येथे पंपगृहाचे टप्पा १ ते ४ मधील बांधकाम, ऊर्ध्वगामी नलिकांचे बांधकाम, तसेच वितरण कुंड उभारण्यात येणार आहेत. याशिवाय चिखली व घुटेवाडी येथे बंद नलिका वितरण प्रणाली उभारण्याचे काम निविदेत समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे स्थापत्य, विद्युत व यांत्रिक कामेही केली जाणार आहेत. योजनेच्या माध्यमातून पाणी वापर संस्थेची स्थापना करून शेतकऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या सहकार्याने नलिका वितरण प्रणालीची पाच वर्षे देखभाल व दुरुस्ती केली जाणार असून, त्यानंतर ही प्रणाली पाणीवापर संस्थांकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे यांच्या स्वाक्षरीने ही निविदा प्रसिद्ध झाली आहे. १७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ई-निविदा उपलब्ध राहणार असून २ सप्टेंबर रोजी निविदा उघडण्यात येणार आहे.

................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: मोठी बातमी! पुण्यातील प्रसिद्ध 'बर्गर किंग'वर FDAची कारवाई; 'झेप्टो'लाही तुकाराम मुंढेंचा दणका

Service Medals: वीरता-सेवा पदकांची घोषणा! CRPF ला सर्वाधिक पदकं; देशाच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावणाऱ्या जवानांचा सन्मान

अखेर जेठालाल- बबिताचं लग्न झालं! दयाबेनने वाढलं जेवण; दिग्दर्शकाला नाही जमलं ते AI ने करून दाखवलं; व्हिडिओ होतोय व्हायरल

Vastu Tips: उशीखाली किंवा बेडवर औषधं ठेवताय? वास्तूमध्ये का मानले जाते अशुभ? जाणून घ्या नियम!

पाकिस्तान, श्रीलंका ते अमेरिका... जगभरातील लोक भारताकडे कसं बघतात? सर्वात मोठा सर्व्हे समोर

SCROLL FOR NEXT