पुणे

''घोड''मध्ये केवळ मृतसाठा शिल्लक

CD

गुनाट, ता. २२ : पावसाचे आगमन लांबल्याने सद्यपरिस्थितीत चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरणात फक्त मृतसाठा शिल्लक राहिला आहे. परिणामी शिरूर व श्रीगोंदा तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाणीपुरवठा योजना तसेच रांजणगाव औद्योगिक वसाहतीलाच पाणीपुरवठा करताना या धरणाची दमछाक होत आहे. धरणालाच कोरड पडली असताना या धरणावरून श्रीगोंदा व अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन तालुक्यांसाठी राबवण्यात येणारी महत्त्वाकांक्षी ‘साकळाई योजना’ कशी यशस्वी होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ३२ गावांसाठी ही योजना राबवली जाणार आहे. त्यासाठी दोन टीएमसी पाणीसाठा उपसण्याची परवानगी असून ९६०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच या योजनेसाठी अंदाजे १२३४ कोटींचा निधी मंजूरही आहे. विशेष म्हणजे ही योजना राबवण्यासाठी धरणात दोन टीएमसी एवढा जास्तीचा पाणीसाठा शिल्लक राहतो, असे विशेष निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. साकळाई योजना कार्यान्वित झाली तरी केवळ १ जुलै ते १५ ऑक्टोबर म्हणजेच साडेतीन महिनेच धरणातून पाणी उपसण्याची परवानगी शासनाने दिली आहे.

घोडच्या मूळ लाभार्थ्यांवर येणार गदा
साधारणपणे ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात धरणाचे दरवाजे बंद केले जातात. त्यामुळे सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यातही यातून पाणीसाठा उपसला जाणार आहे. याचा निश्चितपणे परिणाम घोडच्या आवर्तनावर आणि पाणीसाठ्यावर होऊन एप्रिल, मे महिन्यातच पाणीसाठा शून्य टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. त्यातच या वर्षी निर्माण झालेल्या एल निनोच्या संकटामुळे मागील महिन्याभरात पाऊसच न झाल्याने धरणातील पाणीसाठा शून्यावर गेला आहे. अशीच परिस्थिती जर भविष्यात निर्माण झाली तर पाणीटंचाईचे संकट अतिशय गडद होणार आहे. त्यामुळे अशा विदारक परिस्थितीत सगळी राजकीय इच्छाशक्ती एकवटून जरी साकळाई योजना राबवली तरी ती घोडच्या मूळ लाभार्थ्यांच्या हक्काच्या पाण्यावर गदा आणणार हे नक्की.

भविष्यकालीन पाण्याचे गंभीर संकट पाहता घोड धरणाऐवजी विसापूर धरणावरून साकळाई योजना राबवणे अधिक लाभदायक ठरणार आहे. असे झाल्यास शासनाच्या ५०० कोटींची बचत होईल. या भागातील शेतकरी व शेती व्यवस्था जिवंत राहण्यासाठी व या योजनेचा फेरविचार करण्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
- बाळासाहेब घाटगे, राज्य उपाध्यक्ष, शेतकरी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA World Cup 2026: पोटासाठी कारखान्यात मजुरी अन् स्वप्नासाठी फुटबॉल... दुहेरी लढाई लढणारा पोरगाच ठरला जर्मनीचा 'तारणहार'

Afghanistan Earthquake: अफगानिस्तान पुन्हा हादरलं! पूर्व प्रांतात ५.२ रिश्टर स्केलच तीव्रतेचा भूकंप; नैसर्गिक आपत्तीचा इशारा

कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत १४ विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू; बचावकार्य युद्धपातळीवर, उपमुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

One Nation One Ration : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता देशभरात कुठूनही घेता येणार रेशन; 'या' लोकांना होणार फायदा

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र; RTI कायद्यातील दुरुस्तीविरोधात आक्रमक

SCROLL FOR NEXT