पुणे

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत साक्षीने मिळवले यश

CD

अडीच किमीची पायपीट अन्‌ जिद्दीच्या जोरावर साक्षीचे यश
वालवडच्या साक्षी जाधवर हिला दहावीत ९४.४० टक्के गुण

सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. ९ : घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची... आई-वडील कधी भाजी विक्री तर कधी शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही वालवड (ता. बार्शी) येथील साक्षी दादासाहेब जाधवर हिने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत ९४.४० टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या जन्मभूमीत असलेल्या कर्मवीर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या साक्षीने संघर्षातून यशाची प्रेरणादायी कहाणी घडवली आहे. वालवड ते चारे हे सुमारे अडीच किलोमीटरचे अंतर ती दररोज कधी चालत तर कधी बसने पार करून शाळेत जात होती. प्रतिकूल परिस्थिती असतानाही शिक्षणाची ओढ आणि यशाची जिद्द तिने कायम ठेवली.
विशेष म्हणजे, कोणताही खासगी क्लास किंवा शिकवणी न लावता तिने हे यश मिळविले आहे. शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची नियमित अभ्यासाची सवय यामुळेच हे यश शक्य झाल्याचे साक्षीने सांगितले.
कष्टाशिवाय पर्याय नाही, हे मी ओळखले होते. शिक्षकांनी शाळेत दिलेला अभ्यास रोज न चुकता करत गेले. त्याच मेहनतीचे हे फळ आहे, अशी भावना साक्षीने व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gen-Zचा जलवा, पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’चा जयघोष अन्... यंदा लाल किल्ल्यावर मोठे बदल दिसणार; ८०व्या स्वातंत्र्यदिनी काय खास होणार?

PSI Merit List Issue : पीएसआयची गुणवत्ता यादी रखडल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; एमपीएससीच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

बाळंतपणानंतर थायरॉईडची समस्या वाढतेय? शरीरातील 'या' बदलांकडे करू नका दुर्लक्ष

SHRAVAN 2026 : “श्रावणात भोलेनाथांची विशेष कृपा! ‘या’ राशींच्या आयुष्यात होणार मोठा चमत्कार”

कसा झालेला 'अशी ही बनवाबनवी' मधल्या शंतनूचा मृत्यू? पत्नीने सांगितलं त्या दिवशी काय घडलं; आम्ही चौघेही...

SCROLL FOR NEXT