bhaji  
पुणे

पिंपरी महापालिकेच्या भाजीविक्री केंद्राचा अजब कारभार

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी, महापालिकेने प्रत्येक प्रभागामधील मोकळया जागेत किमान एक तात्पुरत्या स्वरुपातील फळे व भाजीपाला विक्री केंद्र सुरु केले आहे. मात्र, अगोदरच आर्थिक परिस्थितीने पिचलेल्या ग्राहकांना या केंद्रावर भाजीपाला अव्वाच्या सव्वा दरात विकला जात आहे. पण तिच भाजी टेम्पो विक्रेत्यांकडे स्वस्त दरात मिळत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

संचारबंदीत शहरातील नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून महापालिकेने 46 जागेवर "भाजी विक्री' केंद्र सुरु केले आहेत. हा अत्यंत स्तुत उपक्रम असला, तरी या केंद्रचालकांकडून ग्राहकांचा गैरफायदा घेतला आहे. या केंद्रावर प्रत्येक भाजी 40 रूपये पावशेरने विक्री केली जात आहे. याबाबत आकुर्डीतील ग्राहक प्रकाश परदेशी यांनी "सकाळ'कडे तक्रार केली आहे.

दरम्यान, ते म्हणाले, ""सकाळी प्राधिकरणातील नियोजित महापौर निवासी मैदानावर सुरु असलेल्या भाजी विक्री केंद्रावर ग्राहकांकडून जादा दराने भाजी विक्री केली जात आहे. जी भाजी टेम्पो विक्रेत्याकडे 10 रुपये पावशेरने मिळते, तिच भाजी केद्रांवर 40 रूपयांनी मिळत आहे. कोथिंबीरची जुडी 40 रूपयाला, तिच जुडी टेम्पो चालकांकडे 20 रूपये, 80 रुपये प्रती किलो असणारी हिरवी मिरची थेट 120 रुपये प्रती किलोने विक्री होत आहे. बटाटा 40 रूपये पावशेरला मिळत आहे. जर टेम्पो भाजीविक्रेत्याकडे स्वस्त भाजी मिळू शकते, या केंद्रातील भाजी विक्रेते का देऊ शकत नाहीत. ''

मोरवाडीच्या मोकळ्या मैदानावरील भाजीविक्री केंद्रावर इतरही सर्वच भाजीपाल्याचे भाव असेच वाढविले आहे. या भाजी विक्री केंद्रापेक्षा या टेम्पो भाजी विक्रेत्यांकडे स्वस्त भाजी मिळत आहे. सध्या लॉकडाउनमध्ये नागरीकांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे. अशावेळी ग्राहकांची लूट करणे योग्य नाही. ''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link Accident: बोरघाटात थरार! मिसिंग लिंक मार्गावर अनेक भरधाव वाहनांची एकमेकांना धडक; काही गाड्यांचा चक्काचूर

Manchar News : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवा; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे दिलीप वळसे पाटील यांची मागणी

Kolhapur Gokul Politics: सतेज पाटलांसोबतच्या छुप्या मैत्रीचा आरोप करत महायुतीत मुश्रीफांना एकटं पाडण्याचा डाव?

Gill - Ishan Century: कर्णधार शुभमन गिलचं दमदार शतक! ईशान किशनने चोपलं, पण रोहितचं टेन्शन वाढवलं

Latest Marathi News Live Update : भीमाशंकर मंदिरात आता दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ पर्यंत मोफत दर्शन

SCROLL FOR NEXT