Crime esakal
पुणे

Pune Crime : एक कोटी १५ लाखांचे दागिने घेऊन सेल्समन पसार

रविवार पेठेतील एका सराफा दुकानातील सेल्समनने एक कोटी १५ लाख रुपये किमतीच्या सोनसाखळ्या लंपास केल्याचा प्रकार आला समोर.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - रविवार पेठेतील एका सराफा दुकानातील सेल्समनने एक कोटी १५ लाख रुपये किमतीच्या सोनसाखळ्या लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात सेल्समनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विक्रम अमृतलाल बाफना (रा. गिरगाव, मुंबई) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत सराफा व्यावसायिक जितेंद्र धनराज सोनिग्रा (वय ४५, रा. मार्केट यार्ड) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोनिग्रा हे शहरातील छोट्या सराफांना दागिन्यांची विक्री करतात. विक्रम हा सोनिग्रा यांच्या दुकानात सेल्समन म्हणून कामास होता. सोनिग्रा यांनी विक्रमला एक कोटी १५ लाख ४२ हजार रुपयांच्या २४५ सोनसाखळ्या विक्रीसाठी दिल्या होत्या. परंतु त्याने दागिने विक्री न करता फसवणूक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओमानमध्ये ड्रोन हल्ल्यात मृत्यू, शरीराचे तुकडे; DNA टेस्ट करून पार्थिव कुटुंबाकडे द्या; मुंबई हायकोर्टाचे DDGPला आदेश

दीपिकाने धर्म बदलून केलेलं दुसरं लग्न; आता मुलाला नमाज शिकवत आहे अभिनेत्री, भावूक होत म्हणते....

Latest Marathi News Live Update: लातूरमध्ये मद्यधुंद दुचाकीस्वाराने लहान मुलाला उडवले; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Central Railway: मध्य रेल्वेचा दंडवसुलीत विक्रम, विशेष मोहिमेत २४ टीसी ‘करोडपती’

भारतीयांनो लगेच इराण सोडा! युद्धविरामानंतर तेहरानमधील दुतावासाचा इशारा, हेल्पलाइन नंबर जारी

SCROLL FOR NEXT