Salisbury Park Forum fight for renaming of parks in Vikram Kumar Pune
Salisbury Park Forum fight for renaming of parks in Vikram Kumar Pune sakal
पुणे

पुण्यातील उद्यानाच्या नामांतरासाठी सॅलिसबरी पार्क फोरमचा लढा सुरूच...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सॅलिसबरी पार्कमधील महापालिकेच्या नव्या उद्यानाच्या प्रवेशद्वारावर बसविण्यात आलेल्या फलकाबाबत चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी सॅलिसबरी पार्क रेसिडेंट फोरमच्या शिष्टमंडळाला सोमवारी दिले. महापालिकेच्या उद्यानाला माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी त्यांच्या वडिलांचे नाव दिल्याबद्दल सॅलिसबरी पार्कमधील रहिवासी आणि फोरमतर्फे गेल्या चार आठवड्यांपासून आंदोलन सुरू आहे. महापालिकेच्या उद्यानाला ‘पुणे महापालिका उद्यान’ असे नाव देण्याची फोरम आणि परिसरातील रहिवाशांची मागणी आहे.

या बाबत त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. या पार्श्वभूमीवर फोरमच्या शिष्टमंडळाने आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेतली. ‘उद्यानाचे नाव १३ मार्च रोजी रात्री बेकायदेशीरपणे बदलून तेथे यशवंतराव भिमाले उद्यान असा फलक लावण्यात आला. या बाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने ५ मार्च २००० रोजी केलेल्या आदेशाचे उल्लंघन हा फलक लावताना झाला आहे. त्यामुळे तो फलक तातडीने काढून टाकावा आणि नागरिकांच्या भावनांची दखल घ्यावी, ’ अशी मागणी आयुक्तांकडे केली.

त्यावर आयुक्तांनी या बाबतची प्रक्रिया तपासून कार्यवाही करण्यात येईल, असे विक्रमकुमार यांनी सांगितले. तसेच उद्यान व्हावे, यासाठी प्रदीर्घ काळ सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देणारे ७२ वर्षीय गोपेश मेहता यांचेही त्यांनी कौतुक केले. फोरमचे अध्यक्ष फैजल पुनावाला म्हणाले, ‘‘उद्यान नागरिकांच्या करातून साकारले आहे. तेथे लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या कुटुंबियांची नावे देणे चुकीचे आहे. यासाठी आमचा लढा सुरू आहे. तो पुढेही सुरूच राहणार आहे.’’ आयुक्तांना भेटावयास गेलेल्या शिष्टमंडळांत मेहता, पुनावाला, शहनाज चावला, विनीता देशमुख आणि बाळासाहेब रूणवाल यांचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT