mother.jpg 
पुणे

मनाला हेलावणारी बातमी : बाळाला कवेत घेण्यासाठी आईचा जीव तीळ तीळ तुटतोय

सकाळवृत्तसेवा

पुणे : काम संपवून घरी गेल्या-गेल्या "तिच्या'कडे मायेने झेपवणारे अवघ्या साडेतीन वर्षांचे बाळ. पण "तिला' कठोर व्हावे लागतंय आणि हो, काळजावर दगड ठेवून त्याला "नाही, नको' म्हणावे लागतयं. घरी येऊन तास दोन तास झाले तरी आईच्या कुशीत येण्यासाठी आतुर झालेल्या लेकरापासून तिला लांब राहावे लागतंय. मग, काही तासांच्या प्रतीक्षेनंतर लेकराला आईच्या मायेचा हवाहवासा ऊबदार स्पर्श होतो आणि ते खुदकनं हसतं.

हो, हा प्रत्यक्ष अनुभव नारायण पेठेतील शिल्पा मुरकुटे यांचा आहे. कोरोनाविरोधी लढ्यातील या परिचारिका. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण मेमोरिअल रुग्णालयात त्या परिचारिका म्हणून गेल्या 14 वर्षांपासून काम करत आहेत. साडे तीन वर्षाच्या बाळाची आई असणाऱ्या शिल्पा आपले काम संपवून घरी जातात, तेव्हा काही तासांसाठी स्वत:ला वेगळ ठेवतात (अर्थात, आरोग्याची पुरेशी काळजी घेतातच) आणि मग काही तासांच्या प्रतीक्षेनंतर माय-लेकाची गळा भेट होते.

दरम्यान, त्या प्रत्येक क्षणी काळजाचे पाणी-पाणी होते, असा शिल्पा यांचा अनुभव आहे. मात्र, तरीही त्या खचून गेलेल्या नाही. कोरोनाविरोधी लढ्यात त्या खंबीरपणे आरोग्य सेवा देत आहेत.

"कोरानाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्ण रुग्णालयात येतो. तेव्हा तो खूप घाबरलेला आणि बिथरलेला असतो. त्याला धीर देण्याची महत्वाचे असते. त्याचबरोबरच तो उपचाराला अधिकाधिक सकारात्मक प्रतिसाद कसा देईल, यासाठी प्रयत्न करत असतो. अर्थात शारिरीक अंतर राखून रुग्णांशी बोलावे लागते. त्याचा अधिक संपर्कात न येण्याची आम्हाला सुचना आहे. मात्र, तरीही मिळेल त्यावेळी शक्‍य होईल, तसे आम्ही त्यांना मानसिक आधार देतो,'' असेही शिल्पा यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

बरा झालेला रुग्ण म्हणजे कामाची पावती : कोरोना झालेला रुग्ण उपचारातून बरा होतो आणि घरी जातो, तेव्हा आजवर केलेल्या कामाचे श्रेय मिळाल्याचा आनंद होतो. हा आनंद गगनात मावेनासा असतो. कारण प्रत्येक बाबतीत हा आजार नवीन आहे. एखाद्या आजाराबाबत आपण ठामपणे सांगू शकतो, तसे या आजाराचे नाही. भविष्यात काय होईल, हे अद्याप सांगता येत नाही. परंतू पुर्ण काळजी घेतली, तर हा संसर्ग रोखता येऊ शकेल. एकही कोरोनाचा रुग्ण नव्याने रुग्णालयात दाखल होऊ नये, असे वाटते.,'' अशा शब्दात अधिपरिचारिका शिल्पा मुरकुटे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT