samadhan-kamble 
पुणे

आई बांगड्या विकते, वडील चप्पल दुरुस्ती करतात ; मुलगा आयआयटीत संशोधक

सकाळवृत्तसेवा

पुणे - आई रस्त्यावर बसून बांगड्या विकते तर वडील स्वारगेटच्या फुटपाथवर चपला दुरुस्ती करत. पण म्हणतात ना बुद्धिमत्ता घर, परिस्थिती बघून जन्म घेत नाही. समाधान कांबळे हे त्याचेच उदाहरण‌. पुण्यात‌ एका संस्थेच्या‌ पालकत्व योजनेतून त्याने शालेय आणि उच्च शिक्षण घेतले. आता त्याचा‌ प्रवास‌ शास्रज्ञ होण्याच्या‌ दिशेने सुरू झाला आहे. त्याला आयआयटी मद्रास‌ येथे पीएचडी करण्यासाठी‌ प्रवेश मिळाला आहे.

समाधान हा मूळचा सोलापूरचा. परंतु मुलाच्या शिक्षणासाठी आई- वडिलांनी पुण्याकडे धाव घेतली. त्याची घरची परिस्थती अगदी बेताचीच आहे. त्यामुळे शुक्रवार पेठेतील श्री शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये सातवी असताना तो दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेत सहभागी झाला. 

अभावाची परिस्थिती होती. समाधानने मात्र त्या पुढे हात टेकले नाही. अभ्यासात हुशार असलेल्या समाधानने शिक्षणाचे‌ एकेक टप्पे यशस्वीपणे पार केले. गरीबीला बुद्धीने मात‌ दिली. शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले. ते पूर्ण करण्याचे बळ त्याला जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेने दिली. ट्रस्टचे सर्व विश्वस्त यांनी त्याच्यामधील हुशारी ओळखून त्याला मदत‌ केली आणि त्याच्या‌ यशाचे मार्ग अधिक भक्कम होते राहिले. आता‌ देखील‌ या ट्रस्टने सर्व प्रकारचे सहाय्य त्याला केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

समाधान म्हणाला, "फिजिक्स विषय घेऊन बीएस्सीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर इन्स्टिट्यूट आॅफ प्लाज्मा रिसर्च गुजरात येथे इंटर्नशिप केली. त्यानंतर आपण रिसर्च करु शकतो, हा विश्वास आला. आता फर्ग्युसन महाविद्यालयातून एम.एस्सी. करत आहे. यासोबतच पीएचडी करण्याचे ध्येय आहे. त्यासाठी आवश्यक असणारी आणि अतिशय अवघड अशी सीएसआयआर-नेट आणि गेट (जीएटीई)ही परीक्षा उत्तीर्ण झालो असून, आयआयटी मद्रास येथून पीएचडी आता करणार आहे. जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेच्या माध्यमातून माझा सर्वांगिण विकास झाला. ध्येय मोठे ठेवण्याचे मार्गदर्शन मिळाले."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT