पुणे

विधानसभा निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टी ३५ जागा लढविणार

CD

‘सप’ विधानसभेच्या
३५ जागा लढविणार
पुणे ता. १५ ः आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात किमान ३५ जागा लढविण्याचा निर्णय समाजवादी पक्षाच्या मुंबईत झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात किमान ३५ जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे राज्य पदाधिकारी, राज्य कार्यकारिणी सदस्य, जिल्हाध्यक्ष व विविध आघाड्यांचे प्रमुख यांची संयुक्त बैठक मुंबईतील कार्यालयात झाली. या वेळी पक्षाचे उपाध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, परवेझ सिद्दिकी, डॉ. अब्दुल राऊफ, डॉ. विलास सूरकर आदी उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मध्ये नक्कीच सत्तापालट घडेल, असा विश्वास राज्य कार्यकारिणीने व्यक्त केला. त्याचबरोबर पक्षाचे प्रभावक्षेत्र असलेल्या ३५ मतदारसंघांमध्ये लढण्याबाबत प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर अंतिम निर्णय होईल, असे पक्षातर्फे सांगण्यात आले.
दरम्यान, महावितरण कंपनी आणि राज्य सरकारच्या प्रीपेड मीटरच्या निर्णयाच्या विरोधात दोन जुलै रोजी जिल्ह्यांच्या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mark Zuckerberg: मार्क झुकरबर्गने मागितली माफी! पैशांच्या बदल्यात विशिष्ट कंटेंट प्रमोट केल्याची 'मेटा'कडून कबुली?

Latest Marathi News Live Update : आज भारताच्या सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर कपिल सिबल यांनी हा युक्तिवाद मांडला - राऊत

Ajinkya Rahane: 'धोनीच्या निवृत्तीनंतर विराट-शास्त्रींनी टीम इंडियाची मानसिकता बदलली...' रहाणे स्पष्टच बोलला

Velhe NCP Protest: सुनेत्रा पवारांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; वेल्ह्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळ्याची प्रतीकात्मक अंतयात्रा, राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा

Congress News: काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळला! महिला नेत्याचे पक्षाच्या नेतृत्वावर आरोप, काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT