पुणे

समर्थनगरच्या नागरी वस्तीतून गेलेल्या उच्च रोधक तारांचे स्थलांतर करण्याची मागणी ; सतत ठिणग्या उडून होतोय आर्थिक नुकसान

CD

JEU26B07864
समर्थनगर ः नागरी वसाहतीतून गेलेल्या ३३ केव्हीच्या धोकादायक तारा.

नागरी वसाहतीवर ३३ केव्हीच्या धोकादायक तारा

समर्थ नगरातील प्रकार; जिवाला धोका, तारा अन्यत्र हलविण्याची मागणी

जेऊर, ता. १६ : अक्कलकोटजवळील समर्थ नगर ग्रामपंचायत हद्दीत अनेक वर्षांपासून ३३ केव्ही उच्च विद्युत रोध असलेल्या तारा पूर्ण नागरी वस्तीतून गेल्या आहेत. अनेकवेळा मोठा आवाज होऊन ठिणग्या उडून लाखो रुपयांचे नुकसान नागरिकांना सोसावे लागत आहे. नागरिकांच्या जिवालाही धोका आहे. विद्युत मंडळ कार्यालयाने या ठिकाणाहून अन्यत्र पर्यायी सुरक्षित जागी तारा हलवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.
नागरी वस्तीतून उच्च दाबाच्या वीज तारा गेल्यामुळे नागरिकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या तारांमुळे अनेकदा आगीच्या घटना, अपघाताचा धोका आणि घरांचे नुकसान होत आहे. गेल्या अनेक वर्षात या उच्च रोधक तारा आणि खांबा यांच्या निकट संपर्कात असलेले सुधाकर स्वामी, दीपक जरीपटके, गणेश अल्लोळी यांच्यासह कित्येक जणांचे टीव्ही, फ्रिज, सोलापूर पॅनल, मिक्सर यासह अनेक विद्युत उपकरणे जळून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. रहिवाशांनी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाकडून योग्य कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात असून तारा अन्यत्र पर्यायी जागेत हलविण्याची मागणी जोर धरत आहे.

या धोकादायक तारा काढण्यासाठी अनेक वेळा तोंडी आणि लेखी तक्रारी केलेल्या आहेत, पण याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक वेळा आमचे विद्युत साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. भविष्यात एखादा मोठा धोकासुद्धा यामुळे निर्माण होऊ शकतो.
- सुधाकर स्वामी, रहिवासी, आचार्य नगर

फार पूर्वीपासून ही मेन लाइन तिथे आहे. दुधनी, मैंदर्गी, बोरोटी असे दक्षिण भागातील जवळपास ४० गावांना वीज वाहणारी उच्च रोधक तार आहे. नागरिकांनी घरांचे बांधकाम करताना स्पेस ठेवून बांधकाम करावेत जेणेकरून त्रास कमी होईल. डीपीडीसी किंवा अन्य बाबींतून निधी मिळाल्यास अंदाजपत्रक तयार करून सादर करण्यात येईल.
- राजू आडम, उपकार्यकारी अभियंता, एमएसईबी अक्कलकोट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

Indian Army Agniveer Bharti : भारतीय लष्करात अग्निवीरांसाठी मेगा भरती; ऑनलाईन प्रक्रिया सुरु, घरबसल्या कसा अर्ज करायचा? पाहा

Latest Marathi Update: निमंत्रणावरून उपमहापौर- महापौरांमध्ये नाराजीनाट्य

कोण आहे झी मराठीच्या 'सनई चौघडे' मालिकेत दिसणारी नायिका? ५ वर्षानंतर केलंय पुनरागमन, म्हणते-

SCROLL FOR NEXT