University Chowk Flyover
University Chowk Flyover sakal
पुणे

Pune University Chowk : उड्डाणपुलाचा मुहूर्त आतातरी चुकवू नका

संभाजी पाटील @psambhajisakal

पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने एक आराखडा तयार केला आहे. त्यात शहरात २१ ठिकाणी उड्डाणपूल, रेल्वेवरील पूल तसेच ग्रेड सेपरेटर अशा कामांचा समावेश आहे.

विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल उभारण्यास आणखी एक मुहूर्त शोधला आहे. संपूर्ण शहराच्या वाहतुकीवर परिणाम करणारे प्रकल्प वेळेत पूर्ण झाले नाहीत, तर काय होते याचा अनुभव विद्यापीठ, कात्रज चौक, नगररोडवर पुणेकरांना दररोज येत आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम वेळेत पूर्ण होईल, यासाठी नागरिकांनाच दबाव वाढवावा लागेल.

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने एक आराखडा तयार केला आहे. त्यात शहरात २१ ठिकाणी उड्डाणपूल, रेल्वेवरील पूल तसेच ग्रेड सेपरेटर अशा कामांचा समावेश आहे. शहराचा होणारा भौगोलिक विस्तार, वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढणारी संख्या लक्षात घेता उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर अशा पायाभूत सुविधा वाढवाव्या लागणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारकडून दोन हजार कोटींची तरतूद करण्यात येईल, असे आश्वासनही दिले आहे. त्यामुळे ही कामे होण्यासाठी निधीची चणचण भासणार नाही.

पण प्रश्न आहे तो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा. उभारण्यात येणारा प्रकल्प बिनचूक असेल याचा. कारण विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल सदोष असल्याने पाडावा लागला. हडपसर येथील उड्डाणपुलावर सिग्नल बसविण्याची नामुष्की आली. कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचे काम अजून किती वर्ष चालणार माहिती नाही. जी-२०च्या निमित्ताने रस्त्यांवर डांबर टाकण्याची जी कामे सुरू आहेत, त्यांच्या दर्जाकडे कोणाचे लक्ष नाही. थोडक्यात हाती घेतलेल्या प्रकल्पांची कामे वेळेत आणि बिनचूक होत नाहीत. जर मेट्रो त्यांची कामे विना अडथळा वेळेत पूर्ण करीत असेल, तर इतर कामे का होत नाहीत, याचा विचार प्रशासक, लोकप्रतिनिधींनी करायला हवा.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील (आनंदऋषीजी चौक) उड्डाणपूल जुलै २०२० मध्ये पाडला. त्याचवेळी हा पूल तातडीने उभारण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत या ठिकाणी वाहतूक कोंडीशिवाय दुसरे काहीच झाले नाही. अजित पवार पालकमंत्री असताना त्यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये काम सुरू होईल, असे सांगितले होते. नवीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या पुलाबाबत बैठक घेतली; पण काम सुरू झाले नव्हते. पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाने (पुम्टा) यापूर्वीच दुहेरी उड्डाणपुलाचे काम जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता ३० जानेवारी २०२३ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे जाहीर केले आहे. महापालिका, पीएमआरडीए आणि वाहतूक पोलिस यांच्यात समन्वय नसल्यानेच या पुलाचे काम लांबणीवर पडलेले आहे. आता ते एका वर्षात कसे पूर्ण करणार? हा खरा प्रश्न आहे.

एकाबाजूला प्रत्यक्ष उड्डाणपूल आणि मेट्रोचे काम वेगात होईल यासाठी, तर दुसरीकडे सध्याच्या परिस्थितीत वाहतूक सुरळीत कशी राहील यासाठी काम करावे लागेल. महापालिका, पीएमआरडीए आणि वाहतूक पोलिस यांना एकमेकांमध्ये समन्वय ठेवून जास्तीचे मनुष्यबळ वापरून या परिसरात वाहनांची कोंडी कमी करण्यासाठी अधिकचे प्रयत्न करावे लागतील.

कोंडी टाळण्यासाठी

  • वाहतूक पोलिसांची प्रशिक्षित टीम

  • पर्यायी मार्ग अतिक्रमण मुक्त ठेवणे

  • कामावर देखरेखीसाठी स्पेशल टास्क फोर्स

  • काम वेळेत पूर्ण करणाऱ्यांना प्रोत्साहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT