raigad 
पुणे

संभाजीराजे पुण्याच्या युवकाला म्हणाले, शिवछत्रपतींचा मावळा... 

सकाळवृत्तसेवा

पुणे : चक्री वादळाचा फटका बसलेल्या रायगड किल्ल्यावरील कुटुंबांना मदत करण्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी केलेल्या आवाहनाला तातडीने कृतीतून प्रतिसाद देणाऱ्या पुण्यातील राज देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे छत्रपती संभाजीराजे यांनी कौतुक केले.  

रायगड किल्ल्यावरील आणि हिरकणीवाडी, टकमकवाडी येथील कुटुंबांचे काही दिवसांपूर्वी झालेल्या निसर्ग चक्री वादळाने मोठे नुकसान झाले. या वादळाचा जबरदस्त तडाखा रायगड किल्ल्यावर राहणाऱ्या कुटुंबांना बसला. अनेकांच्या घरावरील छप्पर या वादळात उडून गेले.

या कुटुंबाना मदत करण्याचे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी फेसबुकद्वारे केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत पुण्यातील विराज तावरे यांच्या माध्यमातून न्यूयॉर्कमधील कल्याण घुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत पाठवली. तसेच, पुण्यातील राज देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधित नुकसानग्रस्त कुटुंबांना मदत केली. 

राज देशमुख आणि त्यांचे सहकारी योगेश केदार, विराज तावरे, अनिकेत घुले, पराग मते, अभय शास्त्री, अक्षय भागवत यांनी रायगड किल्ल्यावर राहणाऱ्या कुटुंबाना छप्पर आणि हिरकणीवाडी व टकमकवाडी येथील नागरिकांना किराणा, ब्लँकेट आणि जीवनावश्यक वस्तू दिल्या. सुमारे चार लाख रुपयांची मदत या वेळी देण्यात आली. या मदतीसाठी सहकार्य करणाऱ्या मुकुल माधव फाउंडेशन व राज देशमुख आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे युवराज संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्टद्वारे कौतुक केले. शिवछत्रपतींचा मावळा राज देशमुख आणि त्यांच्या टीम चे मनःपूर्वक आभार, असे ते कौतुकाने म्हणाले.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या उपोषणाला १५ गावांचा पाठिंबा; कन्नडमध्ये वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर रास्ता रोको

इन्स्टावर ओळख, लग्नाच्या आमिषाने ठेवले संबंध; १७ वर्षीय मुलीनं बाळाला जन्म देताच २० वर्षीय आरोपी फरार, नवी मुंबईतील घटना

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT