हिंगणे - ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम शाळेच्या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर.
हिंगणे - ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम शाळेच्या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर. 
पुणे

समाजहितासाठी होते तेच संशोधन - डॉ. अरविंद नातू

सकाळ वृत्तसेवा

सिंहगड रस्ता - संशोधन समाजाच्या प्रगतीसाठी बाधक न बनता साधक बनले पाहिजे. संशोधन हे समाजाच्या हिताचे असावे, समाजासाठी कल्याणकारी असावे, संशोधन हे विघातक नसावे, असे मत ‘आयसर’चे वरिष्ठ संशोधक डॉ. अरविंद नातू यांनी व्यक्त केले. 

झील एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानगंगा इंग्लिश मीडीयम स्कूलमध्ये अटल टिंकरिंग लॅबच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी काटकर, नगरसेवक प्रसन्न जगताप, शिक्षणाधिकारी सचिन काळे, संस्थेचे सचिव प्रमोद खांदवे, बीएड महाविद्यालयाचे प्राचार्या मिलिंद सूर्यवंशी, डीएड महाविद्यालयाचे प्राचार्य बी. बी. जगताप, ज्ञानगंगा कनिष्ठ महविद्यालयाच्या प्राचार्या अनुराधा निकम, सिल्व्हर क्रेस्टच्या मुख्याध्यापिका अनुजा येरूडकर आणि ज्ञानगंगा शाळेच्या मुख्याध्यापिका रेणुका दत्ता उपस्थित होत्या. 

नीती आयोगाच्या अनुदानातून अटल टिंकरिंग लॅब अर्थात डिजिटल संशोधन प्रयोगशाळेचे उद्‌घाटन करण्यात आले. संशोधनाचा खरा गाभा प्रश्‍नात आहे. ज्याला प्रश्‍न पडतील त्याला उत्तर शोधण्याची सवय होते आणि त्यातूनच शोध लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्‍न पडले पाहिजेत; परंतु ते शोध समाजाच्या हिताचे असले पाहिजे. समाजकल्याण करणारे संशोधन झाल्यास संशोधन केले असे म्हणता येईल, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. 

काटकर यांनी या वेळी शाळेच्या आणि संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. नगरसेवक जगताप यांनी उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांनी प्रदर्शनास भेट देऊन माहिती घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT