समृद्धी महामार्ग नावाने आहे फोटो
...
समृद्धीवर सुरक्षेचा ‘ब्रेक’ कधी?
साडेतीन वर्षांत ६३३ अपघातांत ५७२ जणांचा मृत्यू
शकील राणा : सकाळ वृत्तसेवा
धामणगाव रेल्वे (जि. अमरावती), ता. २ : दुर्गामातेची मूर्ती आणण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला समृद्धी महामार्गावर काळाने गाठले अन् आनंदाच्या प्रवासाचे रूपांतर शोकांतिकेत झाले. शुक्रवारी पहाटे शेगाव येथून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्धेकडे जाणाऱ्या वाहनाला धामणगाव रेल्वेनजीक ट्रकने मागून दिलेल्या भीषण धडकेत सात जणांचा मृत्यू झाला. या घटनेने पुन्हा एकदा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला.
गेल्या साडेतीन वर्षांत या महामार्गावर ६३३ अपघातांमध्ये तब्बल ५७२ जणांना जीव गमवावा लागला, अशी धक्कादायक आकडेवारी समोर आली. त्यामुळे वेगवान प्रवासासाठी उभारलेला हा महामार्ग अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे मृत्यूचा सापळा ठरत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
--------------
आठ महिन्यांत १२८ जणांचा मृत्यू
डिसेंबर २०२२ ते ३१ जानेवारी २०२६ या काळात समृद्धी महामार्गावर ४९१ अपघात झाले असून, त्यात ४४४ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या अवघ्या आठ महिन्यांत १४२ अपघातांमध्ये १२८ जणांना प्राण गमवावे लागले. माहितीच्या अधिकारातून ही आकडेवारी समोर आली.
---------
सुरक्षेचा प्रश्न कायम
‘समृद्धी’वरील अपघातांच्या कारणांचा अभ्यास करताना ‘महामार्ग संमोहन’ हे एक कारण असल्याचे नमूद करण्यात आले. महामार्गावर कोणताही मोठा अडथळा नसताना वाहन दीर्घकाळ एकाच दिशेने सरळ वेगाने धावत राहिल्यास चालकाची हालचाल आणि एकाग्रता कमी होऊ शकते. अशा स्थितीत चालकाची प्रतिक्रिया देण्याची क्षमता प्रभावित होते. या अवस्थेला ‘महामार्ग संमोहन’ असे संबोधले जाते. विशेष म्हणजे समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही चिंतेचा विषय ठरत आहे.
-----------
‘महामार्ग संमोहन’ कारण?
अभ्यासानुसार ‘महामार्ग संमोहन’ हे ३३ टक्के अपघातांमागील कारण असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय ‘लेन कटिंग’ हाही अपघातांचा महत्त्वाचा घटक मानला जातो. महामार्गावर एका लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये जाताना चालकाने योग्य संकेत देणे, आरसे तपासणे आणि मागून येणाऱ्या वाहनांचा वेग लक्षात घेणे आवश्यक असते. मात्र, नियमांचे पालन न करता अचानक लेन बदलल्यास मागून येणाऱ्या वाहनचालकाला त्याचा अंदाज न आल्याने भीषण अपघात होण्याची शक्यता वाढते.
--------
नियमांचे पालन नाही
अभ्यासातील निरीक्षणानुसार ५१ टक्के ट्रकचालक लेन बदलण्यासंदर्भातील नियमांचे पालन करत नसल्याचे आढळले. त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक, रात्रीचा प्रवास, वेग, लेन कटिंग आणि चालकांची एकाग्रता या सर्व बाबींवर अधिक प्रभावी नियंत्रणाची गरज अधोरेखित होत आहे.
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.