पुणे

समृद्धी महामार्ग लूटप्रकरणात चौघांना जामीन मंजूर ; फिर्यादीच्या वाहनातच आढळली सोन्याची चैन !

CD

‘समृद्धी’वरील लूटप्रकरणी
चौघांना जामीन मंजूर
वैजापूर (जि.छत्रपती संभाजीनगर), ता. २६ : समृद्धी महामार्गावर वाहन आडवे लावून चालकाला मारहाण व लूट केल्याच्या कथित प्रकरणात येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी चौघा संशयितांना सोमवारी सशर्त जामीन मंजूर केला.
किरण अजिनाथ गायकवाड , अनिल जयराम जाधव, उमेश लक्ष्मण गायकवाड व ओमकार रामचंद्र फसले अशी जामीन मिळालेल्यांची नावे आहेत. २६ ऑगस्टला साहिल सोनवणे (रा. टाकळीमिया, जि. अहिल्यानगर) हे फॉर्च्युनरने समृद्धी महामार्गावरून जात असताना हडसपिंपळगाव शिवारातील एक्झिट १८ जवळ अज्ञात व्यक्तींनी वाहन आडवे लावून मारहाण करत लुटल्याची फिर्याद वैजापूर पोलीस ठाण्यात दिली होती. स्थानिक गुन्हे शाखेने तपास करत ११ जणांना ताब्यात घेतले होते. तपासाची सद्यःस्थिती आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने चौघांना अटींवर जामीन मंजूर केला.
साखळी स्वतःच्याच मोटारीत सापडली
जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने महत्त्वाचे मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. संशयितांकडून कोणतीही चोरीची वस्तू जप्त झालेली नाही, तसेच ओळख परेडदरम्यान तक्रारदाराला संशयितांची ओळख पटवता आली नाही, असा युक्तिवाद करण्यात आला. विशेष म्हणजे, तक्रारदाराने न्यायालयात दिलेल्या जबाबानुसार, लुटली गेल्याचा आरोप केलेली सोन्याची साखळी तक्रारदाराच्या स्वतःच्या मोटारीत चालकाच्या सीटखालीच मिळून आल्याची बाब समोर आली. हा युक्तिवाद जामीन मिळण्यात महत्त्वपूर्ण ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sayaji Shinde on Bhimashankar project : "पर्यावरण नष्ट करायला तुम्हाला निवडून दिलंय का?"; कर्जत-भीमाशंकरमधील प्रकल्पावरून सयाजी शिंदे भडकले, १ लाख तरुणांची फौज उतरवण्याचा इशारा!

Manchar News : आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राचा आवाज! मंचरचे जैव ऊर्जा तज्ञ ॲड. राहुल पडवळ यांचा नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गौरव

Pune News : मध्यवर्ती पेठांमध्ये दिवसा मालवाहतुकीस बंदी; मालाची चढ-उतार करण्यास रात्री ११ ते सकाळी ९ या वेळेतच परवानगी

Ganja Smuggling : गांजाची तस्करी करणाऱ्या वाहतूक पोलिसाला तेलंगणात अटक

Pune News : पक्षकाराची सही, प्रतिज्ञापत्र नसल्याने पोटगीचा दावा फेटाळला; उत्पन्नाचा तपशीलही दिला नाही

SCROLL FOR NEXT