पुणे

युवा संशोधकांसाठी सॅमसंगतर्फे नवोन्मेष स्पर्धेची घोषणा

CD

युवा संशोधकांसाठी सॅमसंगतर्फे नवोन्मेष स्पर्धेची घोषणा

नवी दिल्ली, ता. १८ : भारतातील युवा संशोधकांना वास्तविक जगातील विविध आव्हानांवर तंत्रज्ञानाधारित उपाय शोधण्यासाठी सक्षम करण्यासाठी संधी देणाऱ्या सॅमसंग सॉल्व्ह फॉर टुमारो या स्पर्धेच्या पाचव्या आवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. सॅमसंगला भारतात ३० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनी या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करत आहे. या वर्षी १४ ते २२ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना एआय लिव्हिंग फॉर इंडिया, आरोग्य आणि शिक्षण, पर्यावरणीय शाश्वतता आणि क्रीडा आणि तंत्रज्ञान या विषयांवर आपले प्रकल्प सादर करायचे आहेत. या स्पर्धेसाठी तीन जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत. या स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या पहिल्या चार संघांना दोन कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. आयआयटी दिल्लीच्या सहकार्याने हे संघ आपल्या कल्पना विकसित करू शकतील. याशिवाय, पहिल्या वीस संघांना २० लाख रुपये, तर त्यानंतरच्या ४० संघांना आठ लाख रुपये आणि सॅमसंगची उपकरणे आणि मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांती मदत उपलब्ध केली जाईल, असे कंपनीच्या दक्षिण पश्चिम आशियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जे.बी. पार्क यांनी सांगितले. देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये १०० कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून,
यानंतर शंभर संघाची निवड करून त्यांना ऑनलाइन प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले जाईल. पुढील फेरीतून ४० संघांची निवड केली जाईल. हा सहा महिन्यांचा कार्यक्रम हजारो सहभागींसाठी प्रत्यक्ष प्रोटोटायपिंग सहाय्य, गुंतवणूकदारांशी संपर्क, तज्ज्ञ मेंटरशिप, इमर्सिव्ह कार्यशाळा आणि व्यापक प्रशिक्षण उपलब्ध करून देईल. भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय कुमार सूद आणि पंतप्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या संचालक डॉ. सपना पोती यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bullet Train Look: 'वेगाची राणी' आली! भगवा रंग अन् फ्युचरिस्टिक डिझाइन... भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक समोर

CBI Arrests RCC Classes Director Shivraj Motegaonkar : नीट पेपरफुटी प्रकरणात प्रा. शिवराज मोटेगावकर अटकेत; विशेष सीबीआय न्यायालयाकडून नऊ दिवस कोठडी

लग्नानंतर बलात्काराचा गुन्हा रद्द! आरोपी, तक्रारदार तरुणीत प्रेमाचे नाते, न्यायालयाचे निरीक्षण

Hapus Mango Price : आंबाप्रेमींसाठी मोठी बातमी! हवामानातील बदलामुळे हापूसच्या दरात मोठी घसरण; बाजारात काय आहेत ताजे भाव?

CSK vs SRH Live: संजू सॅमसन 'फसला', उर्विल पटेलचा आडवा फटका हुकला... पॅट कमिन्सच्या डावपेचांनी चेन्नईला 'पॉवर' दाखवली... Video

SCROLL FOR NEXT