पुणे

घोड नदीत पुन्हा वाळू माफियाराज

CD

गुनाट, ता. १४ : शिरूर आणि श्रीगोंदा प्रशासनाच्या कथित कडक कारवाईचे धिंडवडे काढत वाळू माफियांनी पुन्हा डोके वर काढले आहे. निमोणे, गुनाट, चिंचणी परिसरात घोड नदी पात्रात सात ते आठ बोटींद्वारे राजरोसपणे अवैध वाळू उपसा सुरू असून, महसूल आणि पाटबंधारे विभाग मात्र हातावर हात धरून बसला आहे.
मागील पाच-सहा महिन्यांपासून शांत असलेले घोड नदीचे पात्र आता यांत्रिक बोटींच्या आवाजाने पुन्हा दणाणू लागले आहे. उन्हाळ्यात धरणातील घटलेला पाणीसाठा आणि महसूल विभागाच्या कारवाईमुळे माफियांनी काढता पाय घेतला होता. मात्र, आता धरणात पाणीसाठा वाढताच माफियांना जणू मोकळे रान मिळाले असून, त्यांनी आपला अवैध धंदा पुन्हा जोमाने सुरू केला आहे. शिरूरसह श्रीगोंदा तालुक्याच्या हद्दीत हा उपसा सुरू असताना दोन्ही तालुक्यांचे महसूल विभाग सुस्त आहेत. तर धरणाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेला पाटबंधारे विभागही या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे. त्यामुळे या सर्व यंत्रणांवर कोणत्या राजकीय शक्तीचा दबाव आहे की आर्थिक हितसंबंधांपुढे ते हतबल झाले आहेत, असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत.

दहशतीचे सावट
वाळू वाहतुकीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचा दमदाटीने वापर करणे आणि गावागावांमधून अवजड हायवा भरधाव वेगाने चालवून दहशत निर्माण करण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत. यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, या माफियांना रोखणार कोण, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

घोड धरणातील वाळू माफियांवर मागील वर्षभरात चार वेळा कडक कारवाई केली आहे. लवकरच पुन्हा नियोजनबद्ध कडक कारवाई करण्यात येईलच.
- बाळासाहेब म्हस्के, तहसीलदार, शिरूर

ID: PNE26W49653

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताचा किरकोळ महागाई दर वाढला! सलग तिसऱ्या महिन्यात किंमती वाढलेल्याच, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर काय?

VAIBHAV SOORYAVANSHI: संजू सॅमसन की वैभव सूर्यवंशी? दुसऱ्या टी-२०आधी टीम इंडियासमोर मोठा सवाल; ‘या’ समस्येचाही शोधावा लागणार उपाय

Vastu Tips: घरात मांजर पाळताय? मांजर पाळण्यापूर्वी जाणून घ्या वास्तुचे 'हे' नियम; नाहीतर वाढेल नकारात्मक ऊर्जा!

Interesting Money Story: कुत्र्याला फिरवायला गेले अन् नशीबच पालटलं! ना लॉटरी, ना वारसा... एका क्षणात झाले करोडपती; नेमकं काय घडलं?

अंकिता वालावलकरने गणेशोत्सवादिवशीच दिली गुडन्यूज, मुंबईत घेतलं स्वतःचं घर; कुठे आहे तिचा २ बीएचके? म्हणते- सध्या इंटेरिअर...

SCROLL FOR NEXT