पुणे

मुंबई

CD

वाळूमाफियांना पाठीशी
घालणाऱ्यांवर कारवाई करू

महसूलमंत्री बावनकुळे; विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा

मुंबई ः राज्यात गौण खनिज आणि वाळूमाफियांसोबत संगनमत करून त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी आणि माफियांवर आता कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने विशेष कृती दलाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत गुरुवारी (ता. २५) दिली.
गडचिरोली येथे अवैध गौणखनिज तस्करी करणाऱ्यांनी नायब तहसीलदारावर केलेल्या प्राणघातक हल्ल्याबाबत नाना पटोले, भास्कर जाधव यांनी उपस्थित केले. त्यावर चर्चेदरम्यान महसूलमंत्र्यांनी ही माहिती दिली.
शासकीय अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटित गुन्हेगारांवर आणि त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ‘एमपीडीए’ सारखी कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. वाळू, गौण खनिज तस्करी आणि या क्षेत्रातील तस्कर आणि अधिकाऱ्यांमधील संगनमताचा विषय असून ही समस्या समूळ नष्ट करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली आहे. त्यानुसार अवैधरीत्या गौण खनिजाचे उत्खनन रोखण्यासाठी, तसेच प्रकरणांवर कठोर कारवाईसाठी स्वतंत्र कृती दलाची स्थापना करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात महसूल, अधिकाऱ्यांना कारवाई दरम्यान मारहाण करणे, अंगावर वाहने घालणे, आणि शासकीय वाहनांची तोडफोड करणे अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.

राज्यात ‘ईटीएस’ प्रणाली
राज्यातील अवैध उत्खननाला चाप लावण्यासाठी आता संपूर्ण राज्यात गौण खनिज आणि वाळूसाठी ‘ईटीएस’ प्रणाली लागू करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून केवळ चालू काळातीलच नाही, तर मागच्या १० वर्षांच्या कार्यकाळात राज्यात जिथे कुठे अवैध उत्खनन झाले असेल किंवा होत असेल, त्या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT