पुणे

भाऊबीज संपताच संगमनेर बसस्थानकात महिलांची गर्दी

CD

ID: PNE26W65713
संगमनेर ः येथील बसस्थानकात महिलांसह प्रवाशांची झालेली गर्दी.

संगमनेर बसस्थानकात महिलांची गर्दी
माहेराहून सासरी परतण्यासाठी लगबग ः ७१ बसगाड्यांची सुविधा

संगमनेर, ता. १४ ः दिवाळीचा आनंद, भाऊबीजेचा सण आणि माहेरच्या माणसांसोबत घालवलेले आनंदाचे क्षण संपल्यानंतर महिलांची पुन्हा सासरी परतण्याची लगबग सुरू झाली. त्यामुळे संगमनेर येथील बसस्थानकात सकाळपासून महिलांसह प्रवाशांची गर्दी होत आहे.
एसटी बसस्थानकात दाखल होताच बसमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवाशांची एकच धावपळ उडत आहे. बसस्थानकातील फलाटांवर प्रवाशांची गर्दी, हातात सामान घेऊन बसची वाट पाहणाऱ्या महिला आणि बस येताच जागा पकडण्यासाठी सुरू असलेली लगबग, असे चित्र दिवसभर पहावयास मिळाले. अनेक महिला आपल्या भावांना ओवाळण्यासाठी आणि माहेरच्या माणसांसोबत सण साजरा करण्यासाठी माहेरी गेल्या होत्या. भाऊबीजेचा सण उत्साहात साजरा केल्यानंतर महिला पुन्हा आपल्या सासरी परतण्यासाठी निघाल्या. त्यामुळे सकाळपासून संगमनेर बसस्थानकात महिलांची गर्दी होत आहे. एसटी बस येताच प्रवाशांची बसमध्ये चढण्यासाठी धावपळ सुरू होते. विशेषतः पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवाशांची अधिक गर्दी दिसून येते.
----------
प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन संगमनेर आगारानेही प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष खबरदारी घेतली होती. आगारातून ग्रामीण भागासह विविध लांब पल्ल्याच्या मार्गांवर जवळपास ७१ बसगाड्या सोडण्यात आल्या. यामध्ये पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, पंढरपूर, तसेच मुंबई-बोरीवली आदी मार्गांवरील बसगाड्यांचा समावेश होता.
-नीलेश बेंडकुळे, आगारप्रमुख, संगमनेर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Pollution: उत्तर भारतावर प्रदूषणाची चादर, महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये हवेची गुणवत्ता खालावली; पाहा आजचे AQI

Honey Trap: आधी मैत्री, मग जवळीक अन् नंतर प्रेमाचं जाळं! हेरगिरीसाठी कसा केला जातो 'हनी ट्रॅप'चा वापर?

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी असला तरी 'या' एका निर्णयामुळे पगारात होणार मोठी वाढ; आठव्या वेतन आयोगाचं सोपं गणित

Investment Fraud: वीस दिवसांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष ;गोव्यातील कॅसिनोमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक

Latest Marathi News Live Update: मायक्रो फायनान्स कंपनीवर कारवाई होणार- संजय राठोड

SCROLL FOR NEXT