पुणे

संगमनेर बसस्थानकात ५३ वर्षांची ‘थंडगार’ सेवा सुरू

CD

GHR26A08483
संगमनेर ः येथील बसस्थानकात व्यापारी असोसिएशनतर्फे प्रवाशांना थंडगार पाणी देताना कर्मचारी.

संगमनेर बसस्थानकात ५३ वर्षांची ‘थंडगार’ सेवा
व्यापारी असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम; हजारो प्रवाशांची तहान भागविण्याचे कार्य
संगमनेर, ता. १० ः कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर संगमनेर बसस्थानकात प्रवाशांसाठी थंडगार पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून हा उपक्रम सुरू असून, विशेष म्हणजे मागील तब्बल ५३ वर्षांपासून प्रवाशांची तहान भागवण्याची परंपरा अखंडपणे सुरू आहे.
संगमनेर बसस्थानक हे पुणे आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे येथे दररोज मोठ्या प्रमाणात हजारो प्रवाशांसह विद्यार्थ्यांची वर्दळ असते. ग्रामीण तसेच शहरी भागांतील प्रवासी या बसस्थानकातून प्रवास करत असल्याने दिवसभर गर्दी असते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांना उन्हाच्या झळांपासून काहीसा दिलासा मिळावा आणि त्यांना पिण्यासाठी स्वच्छ व थंडगार पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी व्यापारी असोसिएशनने बसस्थानकात पाणपोई सुरू केली आहे. ही पाणपोई दररोज सकाळपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू असते. प्रवाशांना पाणी देण्यासाठी एका तरुणाची नेमणूक करण्यात आली असून, पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला तो तत्काळ ग्लासभर थंडगार पाणी देत आहे. कोणी एक ग्लास तर कोणी दोन ग्लास पाणी पित असल्याचे चित्र येथे पाहायला मिळते.
दररोज सरासरी ५५ ते ६० जार पाणी या पाणपोईद्वारे वापरले जात आहे. यंदा उन्हाळा अधिक तीव्र असल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत पाण्याची गरज अधिक भासत असून, जारची संख्याही वाढली आहे.
----------
पूर्वी रांजण भरून पाणी ठेवले जात होते. मात्र आता जारच्या माध्यमातून ही सुविधा दिली जात आहे. गेल्या जवळपास ५३ वर्षांपासून व्यापारी असोसिएशन भर उन्हाळ्यात प्रवाशांची तहान भागवण्याचे काम करत आहे. या उपक्रमाचा संपूर्ण खर्च असोसिएशनकडून केला जातो. विशेष म्हणजे प्रवाशांना थंडगार पाणी पिण्यासाठी मिळत आहे.
- अविनाश पुलाटे, व्यवस्थापक, व्यापारी असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आरोपी वृद्ध, क्रूर गुन्हा करू शकतो का? नराधमाच्या वकिलांनी केली जन्मठेपेची मागणी, न्यायाधीशांनी फेटाळला युक्तिवाद

Sanjay Manjrekar: रोहित, विराट किंवा बुमराह नाही...'; टीम इंडियाच्या निवडीवर संजय मांजरेकर स्पष्टच बोलले म्हणाले यशस्वी जैस्वालला...

Maharashtra Politics: मविआला मोठा धक्का! बैठकीला ६० पैकी २३ आमदार गैरहजर; उद्धव ठाकरेंचा एकीचा सवाल

Pune Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणी भीमराव कांबळे दोषी! २९ जूनला शिक्षा... कोर्टात काय घडलं?

NCERT Emergency 1975 : नववीची मुले शिकणार 'आणीबाणी'चा इतिहास; एनसीआरटीने अभ्यासक्रमात केला मोठा बदल

SCROLL FOR NEXT